Lower Dudhana Dam, Selu (Dist.Parbhani)
Lower Dudhana Dam, Selu (Dist.Parbhani) esakal
मराठवाडा

Parbhani : 'लोअर दुधना' क्षेत्रात होणारा सौरऊर्जा प्रकल्प रखडला

विलास शिंदे

सेलू (जि.परभणी) : परभणी (Parbhani) जिल्हा आणि परिसरातील वीजटंचाई लक्षात घेऊन राज्य सरकारने सेलू (Selu) तालुक्यातील लोअर दुधना प्रकल्पाची भिंत व धरण क्षेत्रामधील जागेवर सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प (Solar Energy) उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्या संदर्भात तांत्रिक क्षमता तपासणीच्या कामाला सुरुवातही झाली होती. मात्र या सौरऊर्जा प्रकल्पासाठी राजकीय अनास्थाच कारणीभूत ठरल्याने तो प्रकल्प रखडला आहे. तालुक्यातील लोअर दुधना प्रकल्प क्षेत्रात सौरऊर्जा प्रकल्पाला संबंधित मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने संबंधित जागा गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाकडून ऊर्जा विभागाकडे हस्तांतरित करण्याचे आदेशही देण्यात आले होते. महानिर्मिती कंपनीद्वारे या प्रकल्पाची तांत्रिक क्षमता याचे कामही सुरू झाले होते. लोअर दुधना क्षेत्रात सुमारे साठ मेगावॉट क्षमतेचा हा प्रकल्प, त्याची अंदाजे किंमत चारशे कोटी रुपये इतकी होती. या प्रकल्पाद्वारे सुमारे अडीचशे ते तीनशे स्थानिकांना रोजगार मिळणार होता. (Lower Dudhana Dam)

राज्यात धरण क्षेत्रात उभारला जाणारा हा पहिलाच प्रकल्प होणार होता. राज्यातील इतर धरण क्षेत्रांची तांत्रिक योग्यता तपासून असे प्रकल्प उभारली जाऊ शकले असते. मात्र ऊर्जामंत्र्यांच्या अनास्थेमुळे हा प्रकल्प रखडला. या सोबतच टेक्सटाईल पार्क, औद्योगिक वसाहत, सेलू शहर भूमिगत गटार योजना आदी महत्त्वाकांक्षी प्रकल्पही शासनाच्या विचाराधीन होते. हेही प्रकल्प रखडल्याने शहराचा विकासच खुंटला आहे. गेल्या दोन वर्षांपासून लोअर दूधना प्रकल्प धरणात शंभर टक्के जलसाठा उपलब्ध आहे. या धरण क्षेत्रात सतत होणार्‍या पावसामुळे या धरणातून दूधना नदीपात्रात अनेक वेळा पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

सेलू तालुका जिंतूर मतदारसंघाला जोडल्यानंतर प्रत्येक वेळी जिंतूर मतदारसंघाचेच आमदार प्रतिनिधित्व करित आहेत. सेलू तालुक्यापेक्षा जिंतूर तालुका मतदार संख्येच्या तुलनेने मोठा असल्याने त्या आमदार महोदयांना सेलू तालुक्याच्या विकास कामाबाबत देणे-घेणे नसल्याने येणार्‍या काळातही सेलूकरांना हेच चित्र पाहावयास मिळणार आहे.

- क्राॅमेड अशोक उफाडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT