wan dam.jpg 
मराठवाडा

परळीसह पंधरा गावाचा पाणी प्रश्‍न सुटला; वाण धरण तुडुंब !

प्रा. प्रविण फुटके

परळी वैजनाथ (बीड) : शहरासह तालुक्यातील १५ गावांना पाणी पुरवठा करणारे तालुक्यातील नागापूरचे वाण धरण बुधवारी (ता.२३) पहाटे तब्बल चार वर्षांनंतर ओसंडून वाहत आहे. यामुळे शेतकऱ्यांसह शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

शहर व तालुक्यातील पंधरा गावासाठी नागापूर येथे वाण नदीच्या पात्रात धरण बांधण्यात आलेले आहे. गेल्या तीन वर्षांपासून मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती होती. यामुळे लहान मोठे प्रकल्प कोरडेठाक पडले होते. मागच्या वर्षी परतीच्या पावसामुळे वाण धरण ४० टक्के भरल्याने परळीकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला होता. यंदा मात्र मान्सूनच्या सुरुवातीपासून चांगला पाऊस पडत असल्याने वाण धरणात मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा जमा होऊ लागला आहे. बुधवारी (ता.२३) पहाटे वाण धरण तुडुंब भरले असून चादरीवरुन पाणी ओसंडून वाहत आहे. २०१६ मध्ये पडलेल्या पावसानंतर आज चार वर्षानंतर वाण धरण भरले आहे. धरण भरल्यानंतर शहरासह परिसरातील नागरिक व शेतकरी आनंदी झाले आहेत.

नागरिकांनी केले जलपूजन 
परळीकरांचे तहान भागवणारे नागापूर येथील वाण धरणाचे जल पूजन भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आले. यावेळी उपस्थित भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे,जेष्ठ नेते भीमराव दादा मुंडे, नगरसेवक प्रा. पवन मुंडे, पुंडलीकराव सोळंके, श्रीमंतराव सोळंके, रवी कांदे, किशोर केंद्रे, संतोष सोळंके, स्वामी अप्पा, उपसरपंच नागपूर शिवराज मुंडे, राजेश आघाव दौनापूर, कृष्णा मुंडे डाबी, अरुण पाठक, योगेश पांडकर, बाळू फड, सुरेश सातभाई, दीपक नागरगोजे, महेश बिडगर, अजय गोरे, उमेश बिडगर, विजय माने, अंकुश मुंडे डाबी व भारतीय जनता युवा मोर्चाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

(संपादन-प्रताप अवचार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Home Minister resignation : नेपाळमध्ये मोठा राजकीय भूकंप! गृहमंत्र्यांनी दिला राजीनामा; २० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू

Bidkin Accident : अज्ञात वाहनाने दिलेल्या हुलकावणीमुळे दुचाकीचा अपघात; एक तरुण ठार, एक जण गंभीर जखमी

Gas Leakage : बोईसर तारापूरमध्ये वायू गळती; नागरिकांमध्ये घबराट

Pune Ganpati Visarjan : मिरवणुकीत दीड टन चप्पल, बुटांचा खच; ७०६ टन कचरा उचलला

भाच्याने बळकावली आत्याची जमीन! सावकारी कर्जामुळे आत्महत्या करावी लागेल अशी भावनिक भीती घालून जमीन स्वत:च्याच नावे केली, जमिनीचे १८ लाख दिल्याचेही दाखविले

SCROLL FOR NEXT