LATUR 15 VGP O1.jpg 
मराठवाडा

पाचशे एकरावरील बांबूतून रोज पाच टन सीएनजी; पालकमंत्र्यांना पटेलांनी सांगीतले बाबूंशेतीचे गणित. 

विकास गाढवे

लातूर : बांबू शेतीची लागवड केल्यास एका टनाला अडीच ते तीन हजार रुपयांचे उत्पन्न शेतकऱ्याला मिळू शकते. बांबूपासून सीएनजी गॅस निर्मिती होते. पाचशे एकरावर बांबू लागवड केल्यास रोज पाच टन गॅस निर्मिती होऊ शकते, असे बांबू शेतीचे फायदेशीर गणित माजी आमदार पाशा पटेल यांनी शनिवारी (ता. १४) पालकमंत्री अमित देशमुख यांना सांगितले. यानंतर देशमुख यांनी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एमआयडीसीतील मोकळ्या जागेत बांबू लागवड करण्याची सूचना केली. 

कमी पाणी आणि कोणत्याही प्रकारच्या जमिनीवर चांगल्या प्रकारे वाढणाऱ्या बलकोवा, बिमा आणि सरूच्या बाभळगाव (ता. लातूर) येथील विजयकुमार देशमुख वळसंगकर यांच्या बांबू शेतीला भेट दिल्यानंतर पालकमंत्री देशमुख यांना बांबूशेती चांगलीच भावल्याचे दिसले. जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यात दिवसाला एक फूट उंचीची वाढ होऊन साठ फुटांपर्यंत उंच वाढणाऱ्या या बांबूची भारतात एकमेव बाग अमरावती येथे आहे. बांबूपासून सीएनजी गॅस व इथेनॉल निर्मिती केली जाऊ शकते.

पाचशे एकरावर केलेल्या बांबू लागवडीतून रोज पाच टन सीएनजी गॅस निर्मिती होऊ त्यावर किमान शंभर बस, पाचशे कार व दोन हजार ऑटो रिक्षा चालू शकतात. यातून शेतकऱ्याला एका टनामागे अडीच ते तीन हजार रुपयाचे उत्पन्न मिळू शकते, अशी माहिती पटेल यांनी देशमुख यांना दिली. त्यानंतर शेतकऱ्यांना बांबूशेतीची प्रेरणा म्हणून अशा प्रकारची बांबू लागवड शहर व बाजार समितीच्या एमआयडीसीमधील मोकळ्या कंपाउंड जागेत करावी, अशी सूचना त्यांनी समितीचे ललितभाई शाह यांना केली. या वेळी माजी आमदार वैजनाथ शिंदे, दगडूसाहेब पडिले, लक्ष्मण मोरे, अविनाश देशमुख, बालाप्रसाद बिदादा, संगमेश्वर बोमने, परवेज पटेल व शेतकरी उपस्थित होते. 

(संपादन-प्रताप अवचार)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: पुढील तीन दिवस महत्त्वाचे! मुसळधारेसह भरतीचा इशारा; हवामान विभागाचा 'या' जिल्ह्यांना अलर्ट

Vanjari Reservation: मराठा आरक्षणासारखा वंजारी समाजाचा प्रश्न सुटणार का? ST मध्ये असल्याचा महत्त्वाचा पुरावा सापडला

MLA Rohit Pawar: सर्वसामान्यांना त्रास दिल्यास गय नाही: आमदार रोहित पवार; आपण जनसेवक आहोत विसरु नका, तीन हजार परत करायला लावले

Dermatitis Spread: 'साेलापूर शहरात टिनिया, कॅन्डिडासह त्वचेच्या विकारांत होतेय वाढ'; शहरात अतिवृष्टी, घाण पाणी अन् ओलाव्याचा परिणाम

Viral Restaurant Video : मुलांनी रेस्टॉरंटमध्ये केली 'ही' चूक, पालकांना भरावा लागला २.७१ कोटींचा दंड, नेमकं काय घडलं ?

SCROLL FOR NEXT