Aurangabad News 
मराठवाडा

आता प्रीतम मुंडे यांची फेसबुक पोस्ट व्हायरल

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी १२ डिसेंबर रोजी गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावरुन आपल्या औरंगाबादेतील उपोषणाची घोषणा केली होती. आता त्यांची धाकटी बहीण आणि भाजप खासदार प्रीतम मुंडे यांची याविषयीची फेसबुक पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. 

मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी पंकजा मुंडे येत्या 27 जानेवारीला औरंगाबाद इथं एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहेत. यामध्ये विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे मोठमोठे नेते सहभागी होणार आहेत. पंकजा मुंडे यांच्या या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी औरंगाबादला येण्याचं आवाहन प्रीतम मुंडे यांनी या फेसबुक पोस्टमधून कार्यकर्त्यांना केलं आहे.

मराठवाड्याला हक्काचं पाणी मिळावं, यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेची अंमलबजावणी करावी, यासह इतर मागण्यांसाठी पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात सोमवारी (ता. 27) सकाळी 10 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.

अशी आहे प्रीतम मुंडे यांची फेसबुक पोस्ट

नमस्कार..

मागील अनेक वर्षांपासून मराठवाड्यातील शेतकरी,सामान्य जनता निसर्गाच्या अवकृपेमुळे सतत दुष्काळाचा सामना करत आहे.पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली शेती व शेतकरी बांधव पाण्याअभावी अडचणीत आले आहेत.एकीकडे नैसर्गिक संकटांना तोंड देत असतानाच दूसरीकडे त्यामुळे उद्भवलेल्या बिकट आर्थिक परिस्थितीचा सामना मराठवाडयातील शेतकऱ्यांना करावा लागत आहे.

या दुहेरी संकटांवर मात करण्यासाठी व अशा परिस्थितीतीवर कायम स्वरूपीच्या उपाय योजना करण्यासाठी मा.पंकजाताई मुंडे यांनी भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे, पाण्याचे संवर्धन अशा अनेक शाश्वत स्वरूपाच्या उपाय योजना मराठवाड्यात यशस्वीपणे राबविल्या आहेत. तसेच मराठवाडा वॉटर ग्रीड सारखी महत्वाकांक्षी योजना देखील पंकजाताईंच्या पाठपुराव्याने मागील सरकारने मंजूर केली होती, तिची अंमलबजावणी करणे, त्याच बरोबर मराठवाड्याच्या हक्काचे पाणी,जलसंधारण,पाण्याचे संवर्धन,पिण्याचे पाणी या जिव्हाळ्याच्या मुद्द्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मा.पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वात सोमवार दि.२७ जानेवारी रोजी सकाळी ठीक १०.वाजता औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांसह सामान्य जनतेच्या आयुष्यात सुख समृद्धी नांदती ठेवायची असेल तर मराठवाड्याच्या जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न मार्गी लागणे अत्यावश्यक आहे. मा.पंकजाताई मुंडे यांनी आपल्यासाठी,आपल्या शेतकरी बांधवांसाठी,आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी,आपल्या पाणी प्रश्नांसाठी लढा उभारला आहे.आपण ही या लढ्यात सहभागी होऊन मराठवाड्याच्या पाणी प्रश्नांसाठी लढा उभारणाऱ्या रनरागिणीला पाठींबा देऊ या !!

येताय ना मग...आम्ही येत आहोत...तुम्ही पण या !!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat Video: पैशाने भरलेली बॅग, बनियनवर बेडवर बसले अन् हातात...; शिरसाटांचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

IND vs ENG 3rd Test: दुखापतग्रस्त रिषभ पंतने माघार घेतल्यास ध्रुव जुरेल फलंदाजी करू शकतो का? ICC चा नियम काय सांगतो?

Latest Marathi News Updates : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांचे आंदोलन

Stock Market Crash: आज शेअर बाजार का कोसळला? सेन्सेक्स 700 अंकांनी खाली; कोणते शेअर्स घसरले?

नवीन मालिका 'तारिणी'साठी झी मराठीची 'ही' मालिका घेणार निरोप? प्रेक्षकांनीच सांगितलं नाव, म्हणाले-

SCROLL FOR NEXT