उदगीर पिडीत आंदोलन.jpg 
मराठवाडा

पिडीत मुलीला न्याय मिळालाच पाहिजे, उदगीरात निदर्शने !

युवराज धोतरे

उदगीर (लातूर) : उत्तरप्रदेश येथील अत्याचार पीडित मुलीला न्याय मिळावा, या मागणीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ शुक्रवारी (ता.२) सर्व विरोधी पक्ष कार्यकर्ते व सामाजिक संघटनांच्या वतीने निदर्शने करून श्रद्धांजली वाहण्यात आली.

उत्तर प्रदेश मधील एका मुलीवर अत्याचार करून तिला जिवंत मारले गेल्याची घटना घडली आहे, या घटनेच्या निषेधार्थ अजित शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विविध विरोधी पक्ष सामाजिक संघटनांच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ एकत्र येत योगी सरकारचा निषेध करत पीडित मुलीला न्याय देण्याची मागणी केली.

यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, शहराध्यक्ष मंजूर पठाण,  नगरसेवक फैजमोहम्मद पठाण, एमआयएमचे नगरसेवक फय्याज शेख, अहमद सरवर, अमोल घुमाडे, सतीश पाटील मानकीकर, नवनाथ गायकवाड, सुनील केंदे, मुकेश भालेराव, डॉ अंजुम कादरी, नौशाद शेख, आदर्श पिंपरे, सुधीर कांबळे, दीपाली औटे, बबिता भोसले आदी यावेळी उपस्थित होते.

याप्रसंगी उपस्थित अनेक मान्यवरांनी आपली मते मांडली. उत्तर प्रदेश सरकारने हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न चालविला असल्याचे आरोप यावेळी करण्यात आले. या घटनेचा निषेध करून मयत मुलीला मेणबत्त्या पेटवून यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. जोरदार घोषणाबाजी करून तीव्र निदर्शने करण्यात आली
 

(संपादन-प्रताप अवचार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Navy Collision : अरबी समुद्रात भारत-पाक नौदलाच्या जहाजांची धडक; भारताचा पाकिस्तानला तीव्र इशारा

‘आज मुश्किल से बचे...’ शहनाज गिल बसलेलं विमान हवेत जोरात हलू लागलं, अभिनेत्री प्रचंड घाबरली, Viral Video

'सरकार चर्चा करायला तयार, शिवराळ भाषा आम्ही सहन करणार नाही'

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठी अपेक्षा; 'ही' मागणी पूर्ण झाली तर दीर्घकालीन प्रतीक्षा संपणार

Marathi News Live Updates : गणपतीपुळे मंदिरात १ जानेवारीपासून ड्रेस कोड लागू

SCROLL FOR NEXT