publication
publication 
मराठवाडा

प्रकाशन व्यवसायाला मंदीची झळ पुस्तकनिर्मिती अन्‌ खरेदीही मंदावली

सुशांत सांगवे

लातूर : वाचकांना उत्तमोत्तम पुस्तकांची मेजवानी उपलब्ध करून देणाऱ्या, समाजात वाचनसंस्कृती फुलविणाऱ्या प्रकाशन व्यवसायासमोर सध्या आर्थिक मंदीचे सावट पसरले आहे.

पुस्तकनिर्मितीबरोबरच पुस्तकांची विक्री जवळजवळ 35 टक्क्यांनी कमी झाली आहे. त्यामुळे प्रकाशकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. म्हणूनच अनेक चांगले प्रोजेक्ट समोर असतानाही प्रकाशक ते छापण्याचे धाडस करताना दिसत नाहीत.

बाबा भांड यांचा सकाळशी संवाद

आर्थिक मंदीची झळ वाहन उद्योगापासून काप्रोरेट कंपन्यांपर्यंतच्या अनेक क्षेत्राला बसताना दिसत आहे. तशी ती पुस्तक प्रकाशन या व्यवसायालाही बसत असल्याचे दिसून येत आहे. ज्येष्ठ प्रकाशक बाबा भांड (साकेत प्रकाशन) हे नुकतेच लातूर येथे एका समारंभासाठी आले होते. या वेळी त्यांनी ‘सकाळ’शी या विषयावर संवाद साधला.

ते म्हणाले, गेल्या काही वर्षांत प्रकाशन क्षेत्राला नोटाबंदीचा फटका सहन करावा लागला. त्यानंतर आता लगेचच मंदीचे सावट उभे राहिले आहे. त्यामुळे प्रकाशन व्यवसाय अडचणीत सापडला आहे. पूर्वी आम्ही वर्षातून 100 ते 125 पुस्तके प्रकाशित करत होतो. आता पन्नास पुस्तकेच प्रकाशित करू शकत आहोत. इतकेच नव्हे तर मंदीमुळे 8 ते 9 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करावे लागले.

पुस्तक प्रकाशन क्षेत्राबाबत चर्चा नाही

काशन क्षेत्रात कितीही बदल होत राहिले तर पुस्तकांना मरण नाही, हे वास्तव आहे. मंदीचा वेगवेगळ्या क्षेत्रावर परिणाम होतो. त्या सर्व क्षेत्रांबद्दल चर्चा होते. पण पुस्तक प्रकाशन क्षेत्राबाबत चर्चा होत नाही. त्याकडे लक्ष दिले जात नाही. वास्तविक, हे क्षेत्रही तितकेच महत्वाचे आहे, असेही भांड यांनी सांगितले.

प्रकाशकांची खंत

यासंदर्भात अक्षरधाराचे रमेश राठीवडेकर म्हणाले, दिवाळीत अनेकांचा पुस्तक खरेदीचा मुड असतो. दिवाळी अंकांची विक्रीही मोठ्या प्रमाणात होते. पण यंदा बाजारात अजिबात अनुकूल चित्र नव्हते. तेच चित्र आजही कायम आहे. पुस्तकांचा खप कमी झाल्याने निर्मितीसुद्धा कमी झाली आहे. काही प्रकाशकांकडे उत्तम प्रोजेक्ट आहेत. पण ते छापण्याचे धाडस प्रकाशक सध्या करत नाहीत. लातूरमधील अरुणा प्रकाशनाचे राजकुमार बिरादार यांनीही मंदीमुळे प्रकाशन व्यवसाय संकटात सापडला आहे, अशी खंत व्यक्त के

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT