kapus kharedi 
मराठवाडा

हिंगोलीत चार लाख क्‍विंटल कापूस खरेदी 

राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्‍ह्यात कापूस पणन महासंघ, सीसीआय, खासगी बाजार, थेट पणन परवानाधारक व बाजार समितीमधील अनुज्ञप्तीधारक व्यापाऱ्यांनी गुरुवारपर्यंत (ता.२८) १७ हजार २०६ शेतकऱ्यांनी चार लाख पाच हजार २५४ क्‍विंटल कापूस विक्री केला असल्याची माहिती जिल्‍हा उपनिंबधक सुधीर मैत्रेवार यांनी दिली. 

कोरोनाच्या आजाराचा फैलाव होण्याअगोदर कापूस पणन महासंघाकडे दोन हजार ७१३ शेतकऱ्यांनी ५६ हजार ३७० क्‍विंटल कापूस विक्री केला. सीसीआयकडे आठ हजार २८२ शेतकऱ्यानी दोन लाख ३५ हजार १०० क्‍विंटल, खासगी बाजारात एक हजार ७७२ शेतकऱ्यांनी ३९ हजार १४४ क्‍विंटल कापसाची विक्री केली. 

सीसीआयकडे १८ हजार क्‍विंटल विक्री

बाजार समितीमधील अनुज्ञप्तीधारक व्यापाऱ्यांकडे दोन हजार ४५१ शेतकऱ्यांनी ३९ हजार ८९६ क्‍विंटल कापूस विक्री केला आहे, अशा एकूण १५ हजार २१८ शेतकऱ्यांनी तीन लाख ७० हजार ५१० क्‍विंटल कापूस विक्री केला. कोरोनाचा फैलाव सुरू झाल्यानंतर ८६७ शेतकऱ्यांनी सीसीआयकडे १८ हजार १४५ क्‍विंटल कापूस विक्री केला.

एक हजार ९८८ शेतकऱ्यांचा कापूस

 खासगी बाजारात ५३१ शेतकऱ्यांनी नऊ हजार ७०१ क्‍विंटलची विक्री केली. बाजार समितीतील अनुज्ञप्तीधारक व्यापाऱ्यांकडे ५९० शेतकऱ्यांनी सहा हजार ८९७ क्‍विंटल कापूस विक्री केला. असा एकूण एक हजार ९८८ शेतकऱ्यांनी ३४ हजार ७४३ क्‍विंटल कापूस विकला आहे. 

अडीच हजार क्‍विंटल कापूस

आतापर्यंत कापूस पणन महासंघाकडे दोन हजार ७१३ शेतकऱ्यांनी ५६ हजार ३७० क्‍विंटल कापूस विक्री केला आहे. सीसीआयकडे नऊ हजार १४९ शेतकऱ्यांनी दोन लाख ५३ हजार २४६ क्‍विंटल कापूस विक्री केला आहे. 

बाजार समितीमध्ये तीन हजार शेतकऱ्यांनी केली विक्री

खासगी बाजारात दोन हजार ३०३ शेतकऱ्यांनी ४८ हजार ८८५ क्‍विंटल कापूस विक्री केला आहे. बाजार समितीमध्ये तीन हजार ४१ शेतकऱ्यांनी ४६ हजार ७९३ क्‍विंटल कापूस विक्री केला आहे. आतापर्यंत १७ हजार २०६ शेतकऱ्यांनी चार लाख पाच हजार २५४ क्‍विंटल कापूस विक्री केला आहे. 

एक हजार ९०८ शेतकऱ्यांचा कापूस शिल्लक

कापूस पणन महासंघाचे केंद्र बंद असल्याने १२९ शेतकऱ्यांकडील कापूस खरेदी सीसीआय करणार आहे. तसेच सीसीआयकडे एक हजार ७७९ अशा एकूण एक हजार ९०८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. 

एक हजार ४१ शेतकऱ्यांचा कापूस शिल्लक

जिल्ह्यात नोंदणी झालेल्या बहुतांश शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात आला आहे. सध्या केवळ एक हजार ४१ शेतकरी शिल्‍लक असल्याची माहिती श्री. मैत्रेवार यांनी दिली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आखणी शेतकऱ्यांकडे घरात कापूस पडून आहे. केवळ नोंदणी करता आली नसल्याने अशा शेतकऱ्यांना कापूस विक्री करता आला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा कापूस विक्रीसाठी नोंदणी सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: पाकिस्तान UAE ला पराभूत करत 'सुपर फोर'मध्ये! भारताविरुद्ध पुन्हा होणार सामना, पण कधी अन् केव्हा? जाणून घ्या

Athletics Championship 2025: नीरज चोप्रा विरुद्ध अर्शद नदीम लढत होणार! जाणून घ्या कुठे अन् किती वाजता पाहाता येणार फायनल

PAK vs UAE: पाकिस्तानी विकेटकिपरच्या थ्रोमुळे अंपायरला मोठी दुखापत, मैदानंच सोडावं लागलं; जाणून घ्या नेमकं काय घडलं

Meenatai Thackeray statue case Update: मोठी बातमी! मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यास २४ तासांच्या आत अटक; गुन्हाही केला कबूल

Disha Patani’s house firing incident: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा अखेर गाझियाबादमध्ये खात्मा!

SCROLL FOR NEXT