Aurangabad news  
मराठवाडा

औरंगाबादच्या निराला बाजारात हुक्का पार्लरचा पर्दाफाश : पंधरा जण ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : निराला बाजार येथील एका हॉटेलच्या चौथ्या मजल्यावरील फ्लो कॅफे ऍण्ड लॉजमधील अवैध हुक्का पार्लरचा गुन्हेशाखा पोलिसांनी पर्दाफाश केला. यात कॅफेचालकासह पंधरा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई गुरुवारी (ता.19) रात्री करण्यात आली.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, फराज अहमद सिद्दिकी (वय 21, रा. कटकटगेट) असे व्यवस्थापकाचे नाव आहे. निराला बाजार येथील आर्टस ऍण्ड एक्‍झिक्‍युटिव्ह हॉटेलच्या चौथ्या मजल्यारील फ्लो कॅफे ऍण्ड लॉजमध्ये अवैधपणे हुक्का पार्लर चालविले जात असल्याची माहिती गुन्हेशाखा पोलिसांना समजली. त्यानंतर रात्रीतून पोलिसांनी या हुक्का पार्लरमध्ये छापा घातला. त्यावेळी फराज सिद्दिकी तंबाखूमिश्रित हुक्का पार्लर चालविताना पोलिसांना आढळून आला.

पोलिसांनी हुक्का पार्लरच्या परवानाबाबत फराजला विचारणा केली, तेव्हा हॉटेलचा परवानाधारक शेख समीर शेख सलीम (रा. लेबर कॉलनी) याच्या सांगण्यावरून हुक्का पार्लर चालविला जात असल्याची बाब त्याने सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. तंबाखूमिश्रित वेगवेगळे फ्लेवर हुक्का ओढण्यासाठी पार्लरमध्ये पुरविले जात होते. ग्राहक रात्री येथे येत होते व हुक्का ओढत होते.

अल्पवयीन मुलगाही आढळला

पोलिसांच्या छाप्यात चौदा ग्राहकांसोबतच एक अल्पवयीन मुलगाही तेथे पोलिसांना आढळला. सर्वांना ताब्यात घेऊन गुन्हेशाखा पथकाने क्रांती चौक पोलिसांच्या स्वाधीन केले. हुक्का पार्लरमधून सतरा हजार पन्नास रुपयांचे साहित्य पोलिसांनी जप्त केले. याप्रकरणी संशयित सोळा जणांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

ही कारवाई सहायक आयुक्त नागनाथ कोडे, निरीक्षक मधुकर सावंत, सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल, उपनिरीक्षक विजय जाधव, शिवाजी झिने, नजीर पठाण, राजेंद्र साळुंके, प्रकाश चव्हाण, प्रभाकर राऊत, संजय जाधव, संदीप क्षीरसागर, नितीन धुळे, शेख सुलताना, प्राजक्ता वाघमारे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Weight Reduction : गॅस संकटाचा मोठा फटका ! घरगुती LPG सिलिंडर बाबत सरकारचा नवा निर्णय

Chhatrapati Sambhajinagar: कचरा संकलनासोबत कर वसुलीवरही नजर; नव्या कंपनीला महापालिका आयुक्तांच्या सूचना

Latest Marathi News Live Update : धाराशिव जिल्ह्यात रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका

Ahilyanagar News: अहिल्यानगर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ९८६ कोटी थकीत; ठेकेदार आर्थिक अडचणीत, २० टक्केच निधी प्राप्त!

Chhatrapati Sambhajinagar: एमपीएससी औषध निरीक्षक परीक्षेत ६९.३३ टक्के उपस्थिती; स्पर्धा परीक्षा;शहरातील ३६ केंद्रांवर ३ हजार ५६९ उमेदवारांची दांडी.

SCROLL FOR NEXT