अनुनायी.jpg 
मराठवाडा

डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या जिवंत समाधीची अफवा; भक्तिस्थळांवर भाविकांची गर्दी 

प्रा. रत्नाकर नळेगावकर

अहमदपूर (जि. लातूर) : राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज शुक्रवारी (ता. २८) दुपारी तीन वाजता समाधी घेणार असल्याच्या अफवेने गुरूवारी (ता.२७) रात्रीपासून त्यांच्या येथील नांदेड रोडवरील भक्तीस्थळावर भाविकांनी तोबा गर्दी केली आहे.

दरम्यान महाराजांवर बंद खोलीत उपचार सुरू असून त्यांनी अन्नत्यागही केल्याची चर्चा आहे. या अस्थिर परिस्थितीत महाराज खोलीतून बाहेर येऊन संवाद साधतील, या आशेने त्यांच्या हजारो अनुयायांनी ठिय्या मारला आहे. अफवेमुळे डॉ. शिवलिंग शिवाचार्यांचे राज्य तसेच देशाच्या कानकोपऱ्यातील भाविक अस्वस्थ झाले असून त्यांच्याकडून महाराजांची प्रकृती व संजीवन समाधीच्या निर्णयाबद्दल विचारणा केली जात आहे.

दरम्यान डॉ. शिवाचार्यांचा एक व्हिडीओही सोशल मिडियावर व्हायरल झाला असून त्यात त्यांनी `माझी प्रकृती फार चांगली असून काही काळजी करण्याचे कारण नाही. तुमची भक्ती व तुमची श्रद्धा माझे आयुष्य वाढवणारी आहे. तुम्ही भक्ती करा व मला व्यवस्थित रितीने जगू द्या`, असे आवाहन त्यांनी एका व्हिडीओतून केले आहे. महाराजांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला असून ते समाधीविषयी नातेवाईकांशी संवाद साधताना दिसत आहेत. यासोबत त्यांच्या उत्तराधिकारी नियुक्तीबाबत ते बोलताना दिसत आहे. यामुळे भाविकांत प्रचंड संभ्रम निर्माण झाला असून त्यांच्याविषयीच्या चर्चेने भाविक अस्वस्थ झाले आहे. यामुळे सर्वांनाच महाराजांनी स्वतः पुढे येऊन भाविकांशी संवाद साधावा, असे वाटत आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.  
डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांचे वय १०४ वर्ष असून पाकीस्तानीतील लाहोर विद्यापीठातून वैद्यकीय अभ्यासक्रमाची पदवी मिळवलेले ते जिल्ह्यातील पहिले डॉक्टर म्हणूनही त्यांची ओळख आहे. शहरापासून सहा किलोमिटर अंतरावरील नांदेड रोडवर चौदा एकर परिसरात  २००७ मध्ये महाराजांनी भक्तीस्थळाची स्थापना केली. या भक्तीस्थळावर महादेव मंदीर व प्रार्थना स्थळ असून तिथेच महाराजांचे नेहमी वास्तव्य असते. भक्तीस्थळावर सामुहिक विवाहासाठी विनामूल्य जागा दिली जाते. महाराजांचे मराठवाड्यात हजारो भक्त असून दरवर्षी श्रावण महिन्यात होमाऱ्या अनुष्ठानालाही भाविकांची गर्दी होते. दोन दिवसापासून त्यांची प्रकृती अस्थिर असल्याचे सांगण्यात येत होते. त्यांच्या उत्तराधिकारी नेमण्यावरून अनेक चर्चा सुरू आहेत. यातूनच त्यांनी अन्नत्यागही केल्याचे सांगण्यात येत आहे. 

अन्नत्यागामुळे दोन दिवसापासून त्यांची प्रकृती बिघडली असून त्यांच्यावर भक्तीस्थळावर उपचार सुरू आहेत. बाहेरील डॉक्टरांकडून उपचार घेण्यास त्यांनी नकार दिल्याचेही अनुयायी सांगत होते. यातच गुरूवारी रात्रीपासूनच भाविकांनी भक्तीस्थळावर गर्दी सुरू केली. दूर अंतरावरून वाहने घेऊन महिला व भाविक दाखल झाले. शुक्रवारी सकाळी गर्दी वाढल्यानंतर प्रशासनाकडून महाराजांच्या प्रकृतीवर विशेष लक्ष ठेवण्यास सुरवात झाली. गर्दी वाढताच महाराजांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगत होते.

दोन व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल

यातच दोन व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने भाविकांचा गोंधळ वाढला. दुपारी तीन वाजता महाराज समाधी घेणार असल्याची अफवा असल्याने भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान हा गोंधळ महाराज स्वतः भाविकांशी संवाद साधून दूर करतील, या आशेने भाविकांनी त्यांच्या बंद खोलीबाहेर ठिय्या मारला. यातच महाराज त्यांचा उत्तराधिकारी नेमण्याची शक्यता व्यक्त केली जात असून ते रक्तसंबंधातील व्यक्तीला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले जात होते. तहसीलदार महेश सावंत, उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी पाटील यांनीही महाराजांची भेट घेऊन प्रकृतीबाबत चौकशी केली.

(संपादन-प्रताप अवचार) 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : मध्य प्रदेशातील सांवर येथे भिंत कोसळून चार महिलांचा मृत्यू, पाच जण जखमी

Otur News : जुन्नर तालुक्यात प्रस्तावित कल्याण–लातूर जनकल्याण महामार्गाला तीव्र विरोध; शेतकरी आक्रमक, धरणे आंदोलनाला सुरुवात

SCROLL FOR NEXT