reports 12 new COVID-19 positive cases At Hingilo 
मराठवाडा

COVID-19 : हिंगोलीत नवे बारा रुग्ण; जिल्ह्यात पहिला बळी

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली :  मुंबईवरून परतलेल्या एका ४९ वर्षीय जवानासह इतर अकरा जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल गुरुवारी (ता. ११) प्राप्त झाला तर वसमत येथील ४५ वर्षीय पुरुषाचा कोरोना आणि इतर आजारांमुळे मृत्यू झाल्याने जिल्ह्यात पहिला बळी गेला आहे. आता सध्या ३९ रुग्णांवर उपचार सुरू  आहेत. दरम्यान, एक रुग्ण बरा झाल्याने त्यास सुटी दिली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कुमार प्रसाद श्रीवास यांनी दिली.

वसमत येथील कुरेशी मोहला या परिसरातील एका ४५ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाल्याने हा परिसर कन्टेन्टमेन्ट घोषित केला होता. या रुग्णावर नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला आहे. प्राप्त अहवालानुसार मुंबईवरून परतलेल्या एका ४९ वर्षीय एसआरपीएफ जवानाला कोरोनाची बाधा झाली असल्याने त्यास कळमनुरी येथील कोविड रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. तसेच हिंगोली तालुक्यातील खानापूर येथील एका ७० वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाल्याने त्यास उपचारसाठी औरंगाबाद येथे भरती करण्यात आले आहे.

याशिवाय अंधारवाडी येथील क्वारंटाइन सेंटर मधील सहा रुग्णांना कोविडची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यात चार व्यक्ती पेन्शनपुरा येथील रहिवासी असून, मुंबईवरून दाखल झाले आहेत. पाचवी व्यक्ती ही औरंगाबाद येथील भोईपुरा येथून आली आहे. सहावी व्यक्ती ही मुंबईवरून कमलानगर येथे दाखल  झाल्याने त्याच्या सहा वर्षांच्या मुलालाही कोरोनाची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. आजपर्यंत एकूण २२२ रुग्ण आढळले असून त्यापैकी १८३ रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. सध्या एकूण ३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. वसमत येथे सद्यःस्थित हयातनगर येथील एकूण तीन कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असून प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगितले जाते.

जिल्हा सामान्य रुग्णालय येथील आयसोलेशन वॉर्डामध्ये एकूण २३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये चोंढी खुर्द पाच, सेनगाव तीन, रिसाला दोन, नगरपरिषद चार, कालगाव सहा, सिरसम एक, ब्राह्मणवाडा एक, सुकळी एक यांचा समावेश आहे. यांना कोणतीही गंभीर लक्षणे नसल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Latest Marathi Breaking News Live Update: महापालिका निवडणुकीत ‘महाआघाडी’चे संकेत

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

Akola Crime : अल्पवयीन चोरट्याकडून २१.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त; घरफोडी प्रकरणाचा वेगवान उलगडा

SCROLL FOR NEXT