साखर गाठी तयार करण्याचे काम शहरातील कडबीमंडीतील व्यावसायिक करत आहेत.  
मराठवाडा

साखरेच्या गाठी तयार करण्याचे कारखाने बंद, कामासाठी मजुरच मिळेना !

तुळजापूर शहरामध्ये साधारणपणे किमान पाच ते दहा मोठ्या-मोठ्या साखरेच्या गाठीच्या भट्ट्या असायच्या.

जगदीश कुलकर्णी

तुळजापूर ( जि.उस्मानाबाद ) : शहरातील साखरेच्या हाराच्या पारंपरिक भट्ट्या यंदा मजूरांअभावी सुरू झालेल्या नाहीत. हारांच्या भट्ट्यांचे आगर असणारे तुळजापूर आता परगाववरून येणाऱ्या हारावर अवलंबून आहे. तुळजापूर शहरामध्ये साधारणपणे किमान पाच ते दहा मोठ्या-मोठ्या साखरेच्या गाठीच्या भट्ट्या असायच्या. तथापि सध्या कामगारांअभावी भट्ट्या चालू नाहीत. तुळजापूर (Tuljapur) शहरामध्ये साखरेच्या हाराच्या भट्ट्या पारंपरिकपणे चालू ठेवण्याचा व्यवसाय येथील गवते तसेच तिकोने यासह अनेक पारंपरिक घराण्यांचा व्यवसाय होता. तथापि अनेक घराण्यांनी सध्या चालू ठेवलेले व्यवसाय बंद केलेला आहे. साखरेच्या गाठीसाठी काम करणारे पारंपरिक मजूर सध्या मिळत नाहीत. (Sakhar Gathi Factories Shut Down Due To Labour Shortages In Tuljapur Of Osmanabad)

तसेच मर्यादित कालावधीसाठीच हार तयार करण्याचा व्यवसाय असल्याने त्यासाठी नवीन कामगार येत नाहीत. साखरेच्या गाठीच्या व्यवसायाचे प्रमाण तसे चांगले आहे. यंदा दहा किलोच्या साखरेच्या गाठी एक हजार रुपयांपर्यंत दर गेलेला आहे, असे व्यापारी सांगतात. वास्तविक पाहता तुळजापूर तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी बत्तासे, साखरेच्या कांड्या तसेच साखर फुटाणे आदींचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे साखरेच्या गाठी तयार करण्यासाठी मोठी मदत होऊ शकते. (Osmanabad)

साचे पडले अडगळीला

साखरेच्या गाठी तयार करण्याचे कारखाने बंद झाल्याने साखरेच्या गाठीचे साचे अडगळीला पडलेले आहेत. अनेक पारंपरिक व्यवसायाची लुप्तता होत आहे.

आमचे पारंपरिक साखरेच्या गाठी तयार करण्याचे कारखाने बंद आहेत. साधारणपणे दहा कारखाने शहरात चालू असायचे. यंदा आमच्या पारंपरिक कारखानदारांपैकी कोणाचेही कारखाने चालू नाहीत. आम्हीच हजार रूपयांस दहा किलो गाठी विक्रीसाठी आणलेल्या आहेत.

- उमेश गवते, जुने साखरेच्या गाठीचे कारखानदार, आर्य चौक, तुळजापूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Latest Marathi News Updates : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडले झुरळ

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मराठी नाट्य परिषदेतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन; कुठे कराल अर्ज? वाचा नियम व अटी

API Duty: आता उपचार स्वस्त होणार! औषधांच्या किमतीबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, कुणाला फायदा?

SCROLL FOR NEXT