indian post  
मराठवाडा

तुम्ही दहावी पास आहात का? तुम्हाला या क्षेत्रात मिळेल सरकारी नोकरी

प्रकाश बनकर

औरंगाबाद : तुम्ही नोकरीच्या शोधात आहात? तुमचे वय 35 वर्षापेक्षा जास्त आहे? तर तुमच्यासाठी सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. कारण पोस्ट कार्यालयातर्फे देशभरात जंबो भरती घेण्यात येत आहे. 18 ते 40 वयोगटातील दहावी उर्त्तीणांसाठी ही भरती घेण्यात येत आहे. यामुळे वाट कसली पाहता, पटकन करा अर्ज आणि व्हा पोस्टाचे कर्मचारी...

भारतीय पोस्ट विभागातर्फे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगाणा यात शाखा डाकपाल, सहाय्यक डाकपाल व ग्रामीण डाक सेवकांच्या रिक्‍त पदासाठी भरती घेण्यात येत आहे. यात महाराष्ट्रात 3 हजार 650 जागा आहेत. यासाठी दहावी उर्त्तीण असलेल्यांना संधी आहे. डाक सेवकांसाठी 10 हजार ते 12 हजार रूपये पगार आहे. तर डाकपाल व ग्रामीण डकासेवकांसाठी 12 हजार ते 14 हजार 500 रूपये पगार देण्यात येणार आहे. 

असा करा अर्ज 
शाखा डाकपाल, सहायक डाकपाल व ग्रामीण डाक सेवकांच्या रिक्त पदांची ऑनलाईन भरती होत आहे. या ऑनलाईन भरतीसाठी उमेदवारांनी https://indiapost.gov.in या किंवा https://appost.in/gdsonline ,
http://appost.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा. पोस्टाने पाठविलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत व ग्राह्य धरले जाणार नाहीत. शाखा डाकपाल, सहायक डाक पाल व ग्रामीण डाक सेवकांच्या पदासाठी अर्ज सादर करण्यासाठी ओपन, ओबीसी, ई डब्ल्यू एस पुरूष उमेदवारांसाठी शंभर रूपये शुल्क आहे. सर्व महिला, सर्व एससी, एस टी व सर्व अपंग उमेदवारांना कोणतेही शुल्क नाही. 30 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन पोस्ट विभागातर्फे करण्यात आले आहे. 

या तारखेचा पर्यंत ऑनलाईन करा अर्ज 

महाराष्ट्रात 1 नोव्हेंबरपासून अर्ज प्रक्रीयेला सुरुवात झाली आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत उमेदवार अर्ज करू शकतो. त्यासह आंध्र प्रदेश, छत्तीसगढ आणि तेलंगाणा राज्यातील पोस्टाचा अर्ज भरणे प्रक्रीया 22 ऑक्‍टोंबरपासून सुरु झाली आहे. 21 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.

राज्य  पदसंख्या  पात्रता पगार
महाराष्ट्र 3650 10 उर्त्तीण (मराठी व कोकणी भाषेचे ज्ञान आवश्‍यक)  10 हजार ते 12 हजार रूपये
आंधप्रदेश 2707 10 उर्त्तीण, तेलंगाणा भाषेचे ज्ञान  10 हजार ते 12 हजार रूपये
छत्तीसगढ 1799 10 उर्त्तीण, हिंदी भाषाचे ज्ञान 10 हजार ते 12 हजार रूपये 
तेलंगाणा 970 10 उर्त्तीण, तेलंगाणा भाषेचे ज्ञान 10 हजार ते 12 हजार रूपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT