crime news
crime news 
मराठवाडा

'तो' पाठवायचा महिला, तरुणींचे फोटो, मग झाले असे...

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - बीड बायपास रस्त्यावरील राजेशनगर आणि यशवंतनगर भागातील कुंटणखान्याच्या दलालांना ग्राहक पुरविण्याचे काम करणाऱ्या एजंटला अखेर पोलिसांनी (बुधवारी (ता.11) बेड्या ठोकल्या. मनोज जाधव (40, दहीहंडे गल्ली, चिकलठाणा) असे संशयिताचे नाव असून, तो ग्राहकांनाही महिलांचे फोटो पाठवत असल्याची माहिती समोर आली
आहे. 

प्रकरणात सदर भागातील कुंटणखान्यावर पोलिसांनी सात डिसेंबरला छापा टाकून प्रत्येकी चार दलाल व ग्राहकांना ताब्यात घेतले आहे. छाप्यादरम्यान राजेशनगर व यशवंतनगरातील दोन वेगवेगळ्या घरांत कोलकाता आणि हैदराबाद येथील तीन वारांगना व गारखेडा परिसरातील एका वारांगनेला पोलिसांनी ताब्यात घेतले.

तसेच दारूसह इतर साहित्य असा सुमारे एक लाख 74 हजार 705 रुपयांचे साहित्य जप्त केले आहे. प्रकरणात दलालांनी पोलिस कोठडीदरम्यान मनोज जाधव हा ग्राहक आणत असल्याची माहिती पोलिसांना दिली. प्रोझोन मॉलचा व्यवस्थापक महंमद अर्शद व अमोल शेजूळ या दोघा ग्राहकांनादेखील मनोजनेच आणल्याची माहितीही त्यांनी दिली. 

मनोजला पोलिस कोठडी 
मनोजला न्यायालयात हजर करण्यात आले असता शुक्रवारपर्यंत (ता.13) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. जे. पाटील यांनी गुरुवारी (ता.12) दिले. प्रकरणात यापूर्वी अटक करण्यात आलेल्या चार दलालांनाही न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी ठोठाविलेली आहे. 

 एजंटच्या साखळीची शक्‍यता 
मनोजला पोलिसांनी अटक केल्यानंतर तपासादरम्यान त्याच्या ताब्यातून एक मोबाईल जप्त करण्यात आला. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता सहायक सरकारी वकील जरिना दुर्राणी यांनी मनोज हा ग्राहकांना महिलांचे फोटो पाठवत होता, यासंदर्भात सखोल माहिती घ्यावयाची असून अद्यापपर्यंत किती ग्राहकांना किती पीडितांचे फोटो पाठवले याचा
तपास करणे आहे.

मनोजसोबत आणखी काही एजंट काम करीत असून, त्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करणे आहे. पीडित महिलांना कुटंणखान्यात आणण्यात मनोजचा सहभाग आहे का, याचादेखील तपास करणे बाकी असल्याने संशयिताला पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : भाजपचे दिल्ली तख्त ‘महाराष्ट्र’च खेचणार : उद्धव ठाकरे

Google Wallet: गुगल वॉलेट भारतात लाँच; Google Payपेक्षा कसे आहे वेगळे, करता येणार 'ही' महत्त्वाची कामे

Crime News: भर कोर्टात 13 महिन्यांच्या बाळाला तिने जमिनीवर आपटलं; न्यायमूर्तीही झाले सुन्न

Dushyant Chautala: "...तर सरकार पाडण्यास मदत करू," माजी उपमुख्यमंत्र्याने काँग्रेसला पाठिंबा देत वाढवले भाजपचे टेन्शन

Latest Marathi News Live Update : राहुल अन् प्रियांका गांधींनी देशाची माफी मागावी; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरुन भाजप आक्रमक

SCROLL FOR NEXT