Six test positive for COVID-19 in Korali Dist Latur  
मराठवाडा

महिला सरपंचामुळे टळले गावावरील मोठे संकट, झाले असे की..

राम काळगे

निलंगा (जि. लातूर) : कोरळी (ता. निलंगा) येथे मुंबईहून आलेल्या कुटूंबातील सहा जण कोरोनाबाधित आढळल्याने पुन्हा एकदा निलंगा तालुका हादरला. रात्री घरात घुसून बसलेल्या या कुटुंबाला गावच्या महिला सरपंचाने कोंडून ठेवले. त्यासाठी चक्क घरला बाहेरून कुलूप लावले. सकाळी रुग्णालयात बोलावून त्यांना दवाखान्यात पाठविले. त्यामुळे कुटुंब कोणाच्या संपर्कात येऊ शकले नाही. 

कोराळी येथील कुटुंबीय गेल्या काही वर्षापासून मुंबईत राहत होते. या कुटुंबाच्या नात्यातील एकाचा मुंबईत आठ दिवसांपूर्वी कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती गावातील सरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आदींना मिळाली होती. मृत्यू झालेल्याचा मृतदेहही नातेवाईकांना दिलेला नव्हता, अशीही माहिती मिळाली होती. त्यातच हे कुटुंब कोणताही परवाना न घेता शनिवारी सायंकाळच्या सुमारास गावी आले व घरी लपून बसले. याबाबत सरपंच कल्पना गायकवाड यांना कळताच त्यांनी सदस्यांसह या कुटुंबाच्या घराला बाहेरून टाळे ठोकले. तशी माहिती तहसीलदार गणेश जाधव, गटविकास अधिकारी अमोल ताकभाते, तालुका आरोग्य अधिकारी श्रीनिवास कदम, पोलिसांना दिली.

सकाळी गावात कुलूप लावून कुटुंबाला रुग्णालयात रवाना केले. येथील रुग्णालयात कुटुंबातील सदस्यांचे स्वॅब नमूने तपासणीसाठी पाठवल्यानंतर आज सायंकाळी अहवाल आला. त्यावेळी सहा जणांना कोरना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. सरपंचांनी वेळीच दखल घेऊन घरात कोंडून ठेवल्यामुळे हे कुटुंब गावातील कुणाशी संपर्कात आले नाही, अशी भावना प्रशासनातील अधिकाऱ्यांसह गावकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. 

धक्कादायक : औरंगाबादेत एकाच वाड्यात तब्बल ६७ कोरोनाबाधित
 
अधिकाऱ्यांची भेट, परिसर सील 
तहसीलदार गणेश जाधव, तालुका आरोग्य अधिकारी श्रीनिवास कदम, गट विकास अधिकारी अमोल ताकभाते यांनी गावात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. परिसर सील केला असून सध्या वरिष्ठ अधिकारी गावात तळ ठोकून आहेत. हे कुटूंब कोणतीही परवानगी न घेता कोराळी गावात आले होते, अशी माहिती ताकभाते यांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update: तापमान आणखी वाढणार; घाटमाथ्‍यावर आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता,कसे असेल हवामान? जाणून घ्या

Swachh Survekshan:आनंदाची बातमी! 'स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत' कऱ्हाड देशात अव्वल; दिल्लीत हाेणार गौरव, सलग सहाव्यांदा पुरस्कार पटकावला

Pune News: वाकडमध्ये फ्लॅटसाठी विवाहितेचा छळ; सासरच्या व्यक्तींची शिक्षा कायम

मोठी बातमी! आता विद्यार्थी अन् प्राध्यापकांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक; वर्गातच असणार बायोमेट्रिकची मशिन; परीक्षेसाठी ७५ टक्के उपस्थिती आवश्यक

Beet Sprouts Chilla: सकाळचा नाश्ता हेल्दी आणि हटके हवाय? मग हा बीट-स्प्राऊट्स चिला एकदा ट्राय कराच!

SCROLL FOR NEXT