Social work of Rudrali and Rishika Patil Chakurkar
Social work of Rudrali and Rishika Patil Chakurkar 
मराठवाडा

तरुणाईसाठी आदर्श : मराठवाड्यातील या भगिनींचे नोएडात कौतुक, कारण...

संदीप काळे

लातूर  : चाकूरकरांच्या दोन नातींनी दिल्लीत आपल्या मराठवाड्याच्या संस्कृतीचे दर्शन दाखविले आहे. दिल्लीत कोरोनाच्या संकटात अडकलेल्या हजारो लोकांना भरपेट अन्न देत या लोकांचा आशीर्वाद घेतले आहेत. दोन लोकांसाठी सुरू केलेला हा उपक्रम आता हजारो लोकांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. चाकूरकरांच्या नातीने उचललेलं हे पाऊल तरुणाईसाठी नक्कीच आदर्श ठरला आहे.

दिल्लीच्या नोएडा भागात रुद्राली आणि ऋषिका पाटील चाकूरकर या दोघीजणी एकेदिवशी सगळ काम आटोपून आपल्या घरी जात होत्या. त्यांना उत्तरप्रदेशामध्ये जाणारी काही माणसं पायी जाताना दिसली. या लोकांना बोलल्यावर त्या दोघींच्या लक्षात आले की, ही माणसे उपाशीच आहेत. त्या दोघींनी या उपाशीपोटी असणाऱ्या माणसांना आपल्या मित्राच्या मदतीने दोनवेळच्या जेवणाची व्यवस्था केली. पुढे त्यांच्या असं लक्षात आलं की, हजारो लोक याच प्रकारे उपाशी आहेत. मग त्यांनी त्याच दिवसांपासून नोएडामधल्या सेक्टर ३६ मध्ये एक तंबू उभारून मोठ्या पद्धतीने अन्नशिजवून लोकांना खायला देण्याचे काम सुरू केले.

येणारे जाणारे, माहिती मिळालेले, वेगवेगळ्या राज्यात जाणारे लोक या तंबूमध्ये भरपेट जेवायचे आणि चाकूरकर बहिणींना आशीर्वाद देऊन पुढे जायचे. मग असे तंबू अनेक ठिकाणी उभारले गेले. आपल्या से अंड इंडिया साई फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी अनेक लोकांना सोशल मीडियाद्वारे या अन्नवाटपाच्या कामात सहभागी व्हा असे आवाहन केले. त्या आवाहनानंतर त्यांना पैसेही मिळाले, त्यांच्यासोबत काम करण्यासाठी अनेक हातही सोबत आले. फिजीकल डिस्टन्स आणि प्रत्येकापर्यंत पोचवणे हे शक्य नव्हतं त्यामुळे जेवण बनवण्याऐवजी धान्य देण्यासाठी सुरवात केली आणि हे काम अनेक दिवसांपासून नोएडात सातत्याने सुरू आहेत. ज्या-ज्या भागात धान्याची मागणी आहे त्या भागामध्ये सकाळी धान्याचा ट्रक जातो आणि गरजूपर्यंत तो धान्य गरजूपर्यंत पोचवले जाते.

अनेकांना दोन वेळचं धान्य
मराठवाड्याची संस्कृती साधू-संतांनी नटलेल्या या संस्कृतीचं आगळेवेगळे दर्शन या कोरोनाच्या काळात दिल्लीकरांना झाले. या दोन्ही बहिणीच्या आणि त्यांच्या मित्रांच्या पुढाकारातून आज अनेकांना दोन वेळचं धान्य मिळत आहे त्यांची चूल पेटत आहे. रुद्राली आणि ऋषिका या दोघींनी उचलेले पाऊल तरुणाईसाठी एक आदर्श बनले आहे.  वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या लोकांच्या माध्यमातून दाळ, हळद, तेल, पीठ, चहापत्ती, बिस्कीट अशा वस्तूंच्या किटस् तयार केलेल्या आहेत. केवळ नोएडा आणि दिल्लीमध्ये नाही. तर अलिगड, त्रिपुरा, केरळ, या भागातून दोन्ही बहिणींना धान्यासाठी फोन येत आहेत. गरजूपर्यंत धान्य देण्यासंदर्भात या दोन बहिणींनी आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या दामिनी दत्ता, हर्ष ए., प्रतीक द्विवेदी, तान्या अग्रवाल हे गरजू माणसांमध्ये जाऊन आपले लोकसेवेचं काम अविरतपणे करीत आहेत.

साई फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांना अनेक लोक मदतही करत आहे. राजकारणात ज्याची बाप माणूस म्हणून ओळख आहे, अशा चाकूरकर यांची ओळख सेवाभावी व्यक्तिमत्त्व म्हणून देखील आहे आणि त्यांच्या दोन्ही नाती त्याचा सेवाभावी किता छानपणे गिरवत आहेत लातूर मराठवाड्यात त्यांच्या या कामाचे खूप कौतुक होत आहे.  
रुद्राली आणि ऋषिकांच्या आई असणाऱ्या डॉ. अर्चना पाटील चाकूरकर आपल्या दोन्ही मुलीबद्दल म्हणाल्या, ‘‘मी माझ्याकडून या कामासाठी पैसे देऊन पहिल्यांदा सुरवात केली. आता ते काम सगळ्यांच्या मदतीने खूप मोठ झालं. सर्वसामान्याला त्याचा खूप फायदा होतो. हे टीम वर्क केल्यामुळे त्याला गती मिळाली आहे.’’

कामगारांना पूर्ण पगार मिळालाच नाही, कोर्टाचे दरवाजे ठोठावले अन...
 
३० मे रोजी ‘यिनबझ’वर लाइव्ह
या दोन्ही बहिणींच्या कल्पनेतून उभी राहिलेली ही चळवळ एवढी मोठी बनली कशी या विषयी दोन्ही बहिणी पर्वा संध्याकाळी ३० मेला संध्याकाळी ७.३० वाजता सकाळ मीडिया ग्रुपच्या ‘यिनबझ’ या पेजवर लाईव्ह असणार आहेत.
  

माझ्या दोन्ही नाती सामाजिक कार्यात रुची घेऊन खूप चांगले काम करतात, याचा मला आनंद आहे. तुम्ही हे काम करा, हे मी किंवा घरातून कुणीही त्यांना सांगितलं नाही. खरंतर काम सुरु झाल्यावर त्यांनी मला याबद्दल सांगितलं. त्यांना मदत मिळते आणि अनेक माणसे त्यांच्यासोबत जोडल्या गेले आहेत. या दोघींचे गरजूसाठी सुरु केलेले हे काम कौतुकास पात्र आहे.
- शिवराज पाटील चाकूरकर, माजी केंद्रीय गृहमंत्री 
 
ज्या गरजूंना धान्य लागते त्या प्रत्येकाकडे आम्हा दोघाबहिणींचा नंबर आहे. आम्हाला कधी वाटलंही नव्हते की आम्ही इतक्या लोकांपर्यंत पोहोचू पण या कामाला खूप मोठी गती मिळालेली आहे.
-  रुद्राली पाटील चाकूरकर
  - 
आमची चळवळ वाढवण्यात सोशल मीडियाचं मोठ योगदान आहे. निःस्वार्थी भावनेतून आमच्यासोबत अनेक लोक जोडलेले आहेत. आमचं फाउंडेशन आहे पण आता नोएडात आमची ही चळवळ लोक चळवळ बनली आहे.
- ऋषिका पाटील चाकूरकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local : गर्दुल्यांकडून मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! दिवसाढवळ्या घडला धक्कादायक प्रकार

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबादची पॉवरप्लेमध्ये खराब सुरूवात; राजस्थानने दिले दोन धक्के

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT