bansode.jpg
bansode.jpg 
मराठवाडा

कोरोनावर मात केलेले राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणतात, तो काळ... 

युवराज धोतरे

उदगीर : कोरोना संसर्गाच्या परिस्थितीत पॉझिटिव्ह रुग्णांना मानसिक बळ अत्यंत महत्त्वाचे ठरते. या मानसिक बाळाच्या आधारावर कोरोनाशी लढता येते. त्यामुळे अशा रुग्णांना मानसिक आधार देण्याची गरज असल्याचे मत राज्याचे पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.

कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबई येथील खाजगी  हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना १५ ऑगस्ट रोजी राज्यमंत्री बनसोडे यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला. या दरम्यान  घेतलेली काळजी व कुंटुबाला  दिलेला आधार याचा अनुभव शब्दात मांडला आहे. कोरोना काळात रुग्णांना मानसिक आधार मोलाचा वाटत असतो. रूग्णांना व त्यांच्या कुटुंबाला मानसिक आधार देणे आवश्यक असते. आता अहवाल निगेटिव्ह आला आहे व लवकरच लोकसेवेचे कार्य पुन्हा नवीन जोमाने सुरू करणार आहे असे राज्याचे पर्यावरण राज्यमंत्री श्री बनसोडे यांनी सागीतले. 

२६ जुलै रोजी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्या दिवसापासून ते मुंबईतील एका खासगी दवाखान्यामध्ये उपचार घेत होते. या काळातील आपला अनुभव त्यांनी सांगितला, या वेळी सर्वांना आवाहन केले आहे की एखाद्याला कोरोनाचा संसर्ग झाला म्हणजे त्यांनी काय गुन्हा केलेला नाही. त्या रुग्णाला अथवा त्याच्या कुटुंबाला मानसिक पाठबळ द्या, फोनवर बोला, शक्य असेल तेवढी मदत करा, मला राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, यांनी मानसिक पाठबळ दिले. या काळातही ते जनतेच्या सेवेत फिरत आहेत. खासदार पवार या वयातही लोकांच्या भेटी घेऊन व राज्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दौरे करून आढावा बैठका घेत आहेत.

मध्यरात्री जिल्हाधिकारी कोवीड वॉर्डात घुसतात तेव्हा... 
पुढील तीन-चार दिवसांमध्ये मी माझ्या मतदारसंघातील विविध भागांना भेटी देऊन विकास कामाचा आढावा घेणार आहे. या सोबतच राज्यातील माझ्या विभागातील विविध विकास कामे बैठकी द्वारे मार्गी लावणार आहे. मागील दहा ते पंधरा दिवसापासून विकास कामासाठी वेळ देता आला नाही. याची खंत त्यांनी बोलून दाखवली.

कोरोनाचा संसर्ग वाढला आहे प्रत्येकानी स्वतः ची व इतराची  काळजी घ्यावी.याला न घाबरता शासनाने दिलेले आदेश तंतोतंत पाळण्यात यावे. भौतिक अंतर राखून आपले व्यवहार करावे या संकटाला आपण सर्वजण मिळून हरवुया असे मत यावेळी पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम, रोजगार हमी, संसदीय कार्य, भुकंप व पुनर्वसन राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केले आहे.

संपादन- प्रताप अवचार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT