ambajogae.jpg 
मराठवाडा

उद्यापासून राज्यभरातील अस्थायी डॉक्टर जाणार संपावर

प्रशांत बर्दापूरकर

अंबाजोगाई : स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयासह राज्यातील अस्थायी वैद्यकीय शिक्षक सोमवारपासून (ता.२) कामबंद आंदोलन करून संपावर जाणार आहेत. शासकीय सेवेत सामावून नियम व शर्थी लागु कराव्यात या मागणीसाठी डॉक्टरांचा हा बेमुदत संप असल्याचे या संघटनेचे समन्वयक डॉ. अमित लोमटे यांनी सांगितले. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
अस्थायी वैद्यकीय शिक्षकांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वेळोवेळी स्थानिक व वरिष्ठ स्तरावर लेखी निवेदने दिली. मागील महिन्यात (ता.१६) राज्यभर काळ्याफिती लावून काम केले. ठिकठिकाणी अधिष्ठाता कार्यालयासमोर निदर्शने केली. तरीही शासन अस्थायी वैद्यकीय शिक्षकांच्या मागणीची दखल घेत नाही.  कोरोनाचे संकट असल्याची जाणीव ठेवून अस्थायी डॉक्टरांनी काम सुरू ठेवून आपली मागणी केली. या संकटात अस्थायी डॉक्टरांनी जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावले, याची शासनाने जाणीव ठेऊन वैद्यकीय शिक्षकांना न्याय द्यावा अशी मागणी या संघटनेने केली आहे.

शिक्षण संचालकांना निवेदन
गुरुवारी (ता.२९) वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय व रुग्णालयात आले असता. संघटनेतर्फे त्यांना मागणीचे निवेदन दिले होते. यावेळी अंबाजोगाई वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांची उपस्थिती होती. निवेदन देऊनही याबाबत काहीच निर्णय झाला नाही. पालकमंत्री, जिल्हाधिकारी व अधिष्ठाता यांनाही अस्थायी वैद्यकीय शिक्षकांच्या मागण्यांवर निवेदन देण्यात आले आहे.

सेवेत कायम करावे डॉ. लोमटे

अस्थायी वैद्यकीय शिक्षकांना सेवेत सामावून,  सातवा वेतन आयोग लागू करावा यासह इतर मागण्या संघटनेच्या आहेत. स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात ३६ अस्थायी वैद्यकीय शिक्षक आहेत. हे सर्व सोमवारपासून (ता.२) कामबंद आंदोलन करणार असल्याचे वैद्यकीय शिक्षक संघटनेचे राज्य समन्वयक डॉ. अमित लोमटे यांनी सांगितले.

(संपादन-प्रताप अवचार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil on Hasan Mushrif : मानाच्या गणपती पूजनानंतर सतेज पाटलांनी हसन मुश्रीफांना केलं टार्गेट; "गोकुळच्या निवडणुकीत पराभव दिसू लागला"

Sugarcane Agitation : माजी खासदार राजू शेट्टी माजी सहकार मंत्र्यांच्या भेटीला ऊस आंदोलनात सहकार्य करण्याची केली विनंती

Water Shortage: अवैध पाणी उपसा करणाऱ्या मोटारी प्रशासनाकडून जप्त

Maharashtra Ganesh Visarjan Live: अलका चौकात गणरायाच्या स्वागतासाठी साकारली भलीमोठी आकर्षक रांगोळी, गणपती मिरवणुकीच्या उत्साहात रंगले पुणे

New Blood Group: वैज्ञानिकांनी शोधला अतिदुर्मिळ 'JAMA' ब्लड ग्रुप! जाणून घ्या रुग्णांना काय होणार फायदा...

SCROLL FOR NEXT