उस्मानाबाद : शहरातील देवीमंदीर परिसरातील पॉझीटिव्ह सापडलेल्या रुग्णांचा शनिवारी (ता.१३)संध्याकाळी मृत्यु झाल्याची माहिती आरोग्य प्रशासनाने दिली आहे. हा रुग्ण कॅन्सरने पिडीत असल्याने त्याच्याकडुन उपचारास प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगण्यात आले आहे. रुग्णाचे वय ३२ असुन तो १८ मेला पॉझीटिव्ह आला होता.
मुंबईवरुन परत आलेल्या एका तरुणाला त्रास होऊ लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.त्या रुग्णास कर्करोगाचा त्रास असल्याने व त्याचा अहवाल पॉझीटिव्ह आल्याने त्याची प्रकृती पहिल्यापासुन चिंताजनक बनलेली होती. गेल्या कित्येक दिवसापासुन त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झालेली नव्हती. त्याचे तीनवेळा स्वॅब घेऊनही तिनही वेळा त्याचे अहवाल पॉझीटिव्ह आले होते.
लॉकडाउनचा ‘मुहूर्त’ साधून बालविवाहाचे ‘शुभमंगल’!
१८ मे पासुन त्याच्यावर उस्मानाबादच्या कोवीड वार्डात उपचार सूरु होते. संध्याकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यु झाल्याने जिल्ह्यातील मयताची संख्या आता चारवर पोहचली आहे. या अगोदर तीन जणाचा मृत्यु झाला आहे. उस्मानाबाद तालुक्यातील एक, कळंब तालुक्यातील एक व उमरगा तालुक्यातील एक अशा तीन रुग्णांचा या अगोदर मृत्यु झालेला होता. तर हा चौथा उस्मानाबाद शहरातील रुग्ण देखील मृत्यु झाल्याने उस्मानाबाद तालुक्यातील दुसरा मृत्यु ठरला आहे.
शंभर कोरोनामुक्त सुखरूप परतले घरी
जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा मोठा दिसत असला तरी सुमारे शंभर जण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यामध्ये संशयितांची संख्या आता ७,४३४ एवढी आहे. त्यातील सात हजार ४१२ जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. तर ६,४५४ होम क्वारंटाइन, तर ९५८ जणांना संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात आले आहे. ५,१३१ जणांनी चौदा दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण केला असून, १६५८ जणांना घरी पाठविण्यात आले आहे.
जिल्ह्यामध्ये शनिवारपर्यंत दोन हजार दोनशे नागरिकांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, त्यातील १४२ पॉझिटिव्ह आले होते. बाधित संख्या जास्त दिसत असली तरी बरे झालेल्यांचा आकडा समाधानकारक आहे. आता जिल्ह्यामध्ये यापुढे नवीन रुग्ण सापडणार नाही यासाठी काळजी घेण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे.
आतापर्यंत उस्मानाबाद शहरात सर्वाधिक ५६ रुग्ण सापडले आहेत. तर इतर ठिकाणीही त्याचा फैलाव वाढला होता. पण आता शहरातीलही परिस्थिती आटोक्यात आलेली आहे. लातूर शहरातील एका महिला रुग्णाच्या संपर्कात सार्वजनिक ठिकाणचे अनेक जण आल्याने त्यांच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.