Crimenews 
मराठवाडा

हातात कत्ती, चाकू घेऊन व्यापाऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न; लातुरात दोघांना अटक

हरि तुगावकर

लातूर : येथील नंदी स्टॉप व जुना औसा रोड परिसरात दोन वेगवेगळ्या घटनात हातात कत्ती, चाकू घेवून व्यापाऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. यात दोघे फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची चार पथके नियुक्त करण्यात आली आहेत. या दोन्ही प्रकरणात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


येथील जुना औसा रोड परिसरात रविवारी (ता.१७) सायंकाळी अमोल गंभीरे, प्रतिक माने व इतर चार जण हातात कत्ती घेवून मोठ मोठ्याने आरडा ओरड करीत दुकान बंद करा असे म्हणत फिरत होते. येथील अशोक कदम व इतर व्यापाऱ्यांच्या दुकानात घुसून त्यांनी पैशचा मागणी केली. त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने हातातील कत्तीने धमकावत वार करण्याचा प्रयत्न केला. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


दरम्यान एक तासाच्या फरकाने नंदी स्टॉप परिसरात अशीच एक घटना घडली. या परिसरात असलेल्या अनुसया गिफ्ट सेंटरसमोर सचिन रमाकांत देशपांडे (वय २३) हा तरुण थाबंला होता. तेथे योगेश नरवडे, दिनेश नरवडे, सत्या अंबेकर आदींनी संगणमत करून तू आमच्याकडे का पाहतोस म्हणून शिविगाळ केली. त्यानंतर योगेश नरवडे याने हातातील चाकू देशपांडे यांच्या गळ्याला लावून धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी दिली. इतर तिघांनी हातातील लोखंडी रॉड व लाकडी काठीने देशपांडे याच्या वडिल व भावास अडवून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.


या घटनानंतर पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे, पोलिस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांनी घटनास्थळाला भेट दिली. यात योगेश नरवडे व सत्या अंबेकर याला अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींचा शोध घेण्य़ासाठी पोलिसांची चार पथके नियुक्त करण्य़ात आली आहेत.

 

या दोनही घटना वेगवेगळ्या आहेत. सदरचे भांडण हे गटागटात झालेले नाही. या दोन्ही घटनामुळे कोणत्याही प्रकारची दहशत निर्माण झालेली नाही. या दोघाना अटक करण्य़ात आली आहे. इतरांचा शोध सुरु आहे. अशा प्रकारच्या घटना घडल्यास तात्काळ पोलिसाना माहिती द्यावी.
निखिल पिंगळे, पोलिस अधीक्षक.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delimitation Bill 2026 : राज्यांच्या विधानसभा जागा ६५० पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव; १३२व्या घटनादुरुस्ती विधेयकावर अमित शहांचे मोठे विधान

रितेशसोबतच्या लग्नाआधी जॉन अब्राहमसोबत जिनिलियाच्या लग्नाची अफवा! अभिनेत्री म्हणाली, 'तो फालतू PR स्टंट'

Road Accident: कोटद्वारजवळ भीषण अपघात! बँकेच्या कामावरून परतणारी व्हॅन शंभर मीटर खोल दरीत कोसळली; आठ जणांचा मृत्यू

Chhagan Bhujbal : मतदारसंघ पुनर्रचनेबाबत महायुतीची भूमिका तीच माझी भूमिका, मंत्री छगन भुजबळ यांनी पुण्यात स्पष्ट केली राजकीय भूमिका

'कुटुंब नियोजन न करणाऱ्यांना जास्त जागा कशासाठी?' डिलिमिटेशनवरून जावेद अख्तरांचा संताप, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT