Hingoli Crime News esakal
मराठवाडा

हिंगोलीत बँक दरोड्यातील ३ आरोपींना अटक, गावठी पिस्तुलासह १२ जिवंत काडतूस जप्त

चोरट्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडून आणखी तीन गुन्ह्याची उकल झाली आहे.

राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्ह्यामध्ये बँक दरोडा प्रकरणातील आरोपींना पकडून आणखी तीन गुन्हे उघड झाले आहे. या आरोपींकडून यापूर्वी विविध गुन्ह्यांमध्ये वापरलेले पिस्तूल, १२ जिवंत काडतूस, बाराबोरचे ९ जिवंत काडतूस, मोटारसायकल, दोन खंजीर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने बुधवार (ता.१९) देण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोलीच्या स्थानिक गुन्हे (Crime) शाखेने ही कार्यवाही केली आहे. १४ जानेवारी रोजी हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातील आंबाचोंढी येथे ग्रामीण बँकेच्या शाखेवर दिवसाढवळ्या बंदूकधारी चोरट्यांनी दरोडा टाकून गोळीबार करून बँक लुटण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी चोरट्यांचा पाठलाग करून नागरिकांच्या मदतीने एका शेतातून या दरोडेखोरांना ताब्यात घेतले होते. (Three Accused Arrested For Bank Robbery In Hingoli)

चोरट्यांची सखोल चौकशी केली असता त्यांच्याकडून आणखी तीन गुन्ह्याची उकल झाली आहे. या गुन्ह्यात वापरलेले वरील साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीमुळे चोरट्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. या कामगिरीबद्दल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी कौतुक केले आहे. दरम्यान पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर कांबळे, पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, सहायक पोलीस निरीक्षक सुनील ग़ोपीनवार, श्री. बोधनापोंड, पोलिस उपनिरीक्षक बालाजी पुंड, नितीन केनेकर यांच्यासह बाळापूर व कुरुंदा पोलीस ठाण्यातील कर्मचारी यांनी कारवाई केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT