संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मराठवाडा

बीड जिल्ह्यात तीन दरोडेखोरांना अटक 

सकाळ वृत्तसेवा

केज (जि. बीड) - शहरात रात्री दरोडा टाकण्याच्या हेतूने दरोडेखोर आले. शहरापासून जवळच असलेल्या कळंब रस्त्यावरील विठाईपुरमजवळील पापालाल लोहिया लोखंडी दुकानाच्या मागील भिंतीलगत अंधारात दडून बसलेले दरोडेखोर गुरुवारी (ता. 12) मध्यरात्री दीडच्या सुमारास नागरिकांना दिसले. दरोडेखोर असल्याची खात्री होताच नागरिकांनी भ्रमणध्वनीवरून पोलिसांना माहिती दिली. क्षणाचाही विलंब न लावता पोलिसांनी धाव घेत तीन जणांना ताब्यात घेतले, तर अंधाराचा फायदा घेऊन दोघे जण पळून जाण्यात यशस्वी झाले. फरारी दरोडेखोरांचा पोलिस शोध घेत आहेत. 

कळंब रस्त्यावरील विठाईपुरमजवळील पापालाल लोहिया लोखंडी दुकानाच्या पाठीमागील भिंतीजवळ दरोडेखोर रात्रीच्या अंधारात दडून बसले होते. दबा देऊन बसलेल्या दरोडेखोरांना काही नागरिकांनी पाहताच याबाबत रात्री दीडच्या सुमारास केज पोलिस ठाण्यात माहिती दिली. यानंतर सहायक पोलिस निरीक्षक विलास जाधव कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मोठ्या शिताफीने, सिनेस्टाईल पद्धतीने तीन दरोडेखोरांना पकडले तर अंधारात दोन दरोडेखोर फरारी झाले.

तालुक्‍यात काही दिवसांत चोरी, दरोडा व खुनाच्या घटना घडल्या आहेत. अद्यापही गुन्हेगारांना पकडण्यात पोलिसांना अपयश आले आहे. अशातच पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी पोलिस ठाण्यास भेट देऊन ढासळलेल्या कायदा-सुव्यवस्थेची माहिती घेऊन सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. अशातच शहरातील कळंब रस्त्यावरील विठाईपुरम वसाहतीजवळ पापालाल लोहिया यांचे एक नवीनच लोखंडी साहित्य मिळण्याचे दुकान सुरू करण्यात आले आहे. याच दुकानाच्या पाठमागे पाच दरोडेखोर दडून बसल्याचे येथील नागरिकांनी पाहिले. लागलीच याची माहिती पोलिसांना कळविली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक पुरोस्तम चोबे यांनी क्षणाचाही विलंब न करता रात्रीच्या गस्तीवर असणाऱ्या सहायक पोलिस निरीक्षक विलास जाधव यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांची घटनास्थळी रवानगी केली.

रात्रीच्या वेळी विलास जाधव यांनी सहकारी पोलिस कर्मचाऱ्यांसह स्वत:चा जीव धोक्‍यात घालून पळून जाणाऱ्या दरोडेखोरांना सिनेस्टाईल पद्धतीने तीन दरोडेखोर पकडले; मात्र अंधारात दोन दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले. यावेळी दरोडेखोरांनी सोबत आणलेली ट्रक (एमएच- 13, एक्‍स- 3897), त्यातील एक लोखंडी गज, एक वेळूची काठी, एक धारदार लोखंडी कत्ती, तीन लोखंडी खिळे, एक हेक्‍साब्लेड, एक क्‍लासिक मिरची पावडरचे पाकीट व मोबाईल आदी साहित्य जप्त केले. 


याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक विलास जाधव यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी संजय राजेंद्र काळे (वय 22, रा. मस्सा खंडेश्वरी, ता. कळंब), शंकर सुरेश काळे (22, रा. मस्सा खंडेश्वरी, ता. कळंब), श्‍यामसुंदर बिभीषण काळे (28, रा. अंधोरा, ता. कळंब), रूपेश रवींद्र काळे (रा. मस्सा खंडेश्वरी, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) यांच्याविरोधात केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक संतोष मिसळे या घटनेचा पुढील तपास करत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: कल्याणमधून ठाकरे उमेदवार बदलणार? आणखी एक अर्ज दाखल झाल्यानं चर्चेला उधाण

Latest Marathi News Live Update : दक्षिण मुंबईतून शिवसेनेच्या यामिनी जाधव यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल

Aranmanai 4 Twitter Review: कुणी म्हणालं, 'ब्लॉकबस्टर' तर कुणी म्हणालं, 'जबरदस्त VFX'; तमन्नाच्या 'अरनमनई 4'नं जिंकली नेटकऱ्यांची मनं

Naach Ga Ghuma Review: 'ती' देखील वर्किंग वूमनच...? हास्य आणि भावनिक क्षणांची रोलर कोस्टर राईड

IND vs PAK T20 World Cup 24 : सामना भारत - पाकिस्तानचा फायदा न्यूयॉर्कच्या हॉटेल्सचा! तब्बल 600 टक्क्यांनी वाढलं रूम्सचं भाडं

SCROLL FOR NEXT