सौर वीज.jpg
सौर वीज.jpg 
मराठवाडा

सौरकृषी पंपाच्या ऑनलाईन अर्जाचा गोंधळ; बेबपोर्टलवर उस्मानाबादेतील तीन तालुकेच गायब!

दिलीप गंभीरे

कळंब (उस्मानाबाद) : वीज समस्येच्या झंझटीतून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी राज्य शासनाने सौरकृषी पंप वाटपाचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार महावितरणकडून विशेष वेबपोर्टलद्वारे कृषी पंपासाठी आँनलाईन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र वीजकंपनीच्या दुर्लक्षामुळे वेबपोर्टलवरून कळंब, भूम, परंडा तालुके गायब झाल्याने शेतकऱयांना यंदा शासनाच्या योजनेचा लाभापासून मुकावे लागते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग धास्तावला आहे.  

शेतकऱयांना दिवसा शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी शासनाने मुख्यमंत्री सौरकृषी पंप योजना सुरु केली आहे. रब्बी हंगामात वीज समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे शेतकऱयांना रात्रीच्या वेळी पिकांना पाणी द्यावे लागते. त्यामुळे सर्पदंश किंवा विजेला स्पर्श होऊन अनेक शेतकऱयांचे प्राण गेले आहेत. वीज समस्येतून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी शासनाने सौरकृषी पंप योजना सुरू केली. या योजनेला शेतकऱयांचा उदंड प्रतिसात मिळत असून या योजनेमुळे शेतकरी समाधानी आहेत. महावितरण कंपनीकडून ही योजना सुरू असून मागच्या काही दिवसांपूर्वी विजकंपनीने आँनलाईन अर्ज करण्यासाठी वेबपोर्टल कार्यन्वित केले. मात्र, या वेबपोर्टलवरुन कळंब व अन्य दोन अशी तीन तालुके गायब असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

शेतकरी धास्तावले;
मागच्या काही दिवसांपासून सौरकृषी पंप मिळविण्यासाठी शेतकरी पोर्टल सुरू केव्हा होते याकडे लक्ष ठेवून होते. पोर्टल सुरू झाले पण कळंब तालुका व अन्य दोन तालुके पोर्टलवर दिसून येत नाही. त्यामुळे आँनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया थांबली असून वेळेत प्रक्रिया न राबल्यास किंवा लाभ न मिळाल्यास मोठे नुकसान होईल या भीतीने शेतकरी धास्तावले आहेत.

माहिती घेऊन सांगतो
सौर कृषी पंपाचा लाभ घेण्यासाठी शेतकरी पळापळ करीत आहेत.पोर्टलवर कळंब तालुका दिसत नसल्याची बाब महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता श्री पाटील यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली असता माहिती घेऊन सांगण्यात येईल असे सांगण्यात आले.

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: पंजाबचा कर्णधार सॅम करनने जिंकला टॉस, चेन्नई संघात दोन मोठे बदल; पाहा प्लेइंग-11

PM Modi Exclusive: क्लिनचिट मी दिलेली नाही.. भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांच्या प्रश्नाला थेट उत्तर

आणिबाणी नंतरच्या निवडणुकी नंतर वाळवा तालुक्याला लागली होती लॉटरी; नेमके काय घडले ?

Zapatlela 3 : 'झपाटलेला ३' मध्ये पुन्हा लक्ष्याच ? ; हॉलिवूडनंतर पहिल्यांदाच मराठीत प्रयोग

SCROLL FOR NEXT