shutterstock 
मराठवाडा

‘देवदूता’च्या दारातून रुग्णावर परतण्याची वेळ

शिवचरण वावळे

नांदेड : कंधार तालुक्यातील एका गर्भवती महिलेची शनिवारी (ता.२८) मार्चला अचानक तब्येत बिघडली. तेव्हा त्या गर्भवती मातेला उपचारासाठी रुग्णालयात जाण्याशिवाय पर्याय नव्हता. बहिणीची दशा बघवत नसल्याने भाऊ उपचार करण्यासाठी बहिणीला कंधारच्या एक नव्हे तर अनेक रुग्णालयात घेऊन फिरला तरी त्याच्या बहिणीला कुठेही उपचार मिळाला नाही. अख्खा कंधार तालुका पायाखाली घालूनही डॉक्टर भेटला नाही तर काही ठिकाणी डॉक्टर असूनदेखील नसल्याचे सांगितले जात होते.

हा प्रकार लॉकडाऊनच्या काळात देखील सामान्य जनतेच्या हिताची काळजी घेणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्रात घडत असल्याचे उघड झाले आहे. कंधार हा काही अपवाद नाही तर नांदेड शहरात देखील असे अनेक प्रकार घडत आहेत.

तपासणीपेक्षा औषध लिहून देण्यावर भर
जियाथे डॉक्टरांनीच ‘कोरोना’ची धास्ती घेतली तिथे ते रुग्णास न तपासताच औषध लिहून देण्यावर भर देत आहेत. विशेष म्हणजे राज्य सरकारने डॉक्टरांना रुग्णालय बंद न ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय रुग्णसेवेत हलगर्जीपणा न करण्याच्या खासगी डॉक्टरांना सूचना दिल्या आहेत. परंतू, काही डॉक्टर त्यांचे पालन करत नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

हेही वाचा - राजस्थानच्या ३०० कामगारांना देगलूरच्या आयटीआयचा आधार : डॉ. विपीन

खासगी रुग्णालय सुरू तरीही गैरसोय
एरव्ही एका रुग्णालयातील एका डॉक्टराकडे अडीचशे तीनशे रुग्ण असले तरी, त्यांची तपासणी झाल्याशिवाय डॉक्टर जेवनसुद्धा करत नव्हते. परंतु आज खासगी रुग्णालय उघडे असून देखील त्याचा सामान्य माणसाला फायदा होत नाही. त्यांना तपासले जात नाही, ही वस्तूस्थिती आहे.

हेही वाचा - पंजाब, हरियाणाचे तीन हजार शीख यात्रेकरू नांदेडात अडकले



एकही डॉक्टर तपासायला तयार नव्हते

मी काल माझ्या बहिणीला घेउन उपचारासाठी कंधारच्या जवळपास अनेक डॉक्टरकडे गेलो. एकही डॉक्टर तपासायला तयार नव्हते. डॉक्टर घरी होतेपण नाही म्हणून तेथे सांगितले जात होते. शेवटी मध्यरात्री लोह्यातील डॉ. जवळगेकर यांनी बहिणीचा उपचार केला.
- भूषण पेटकर.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: आम्ही स्वतःला जाळून घेऊ! बेकायदा इमारतीमधील राहिवाशांची आर्त हाक; डोंबिवलीत काय घडलं?

ज्योती चांदेकरांच्या निधनानंतर 'ही' अभिनेत्री साकारणार पुर्णा आजीची भूमिका? 'त्या' गोष्टीमुळे चर्चेला उधाण

Asia Cup 2025: आक्रमक होणारच! IND vs PAK सामन्याआधी भारताचा कर्णधार सूर्यकुमार अन् पाकिस्तानी सलमान आघाने फुंकले रणशिंग

Pitru Paksha 2025: शॉपिंगसाठी ‘या’ तारखा शुभ, दोष न लागता पूर्वजांचे आशीर्वाद मिळतील

Crime News : परप्रांतीय कंटेनर चालकाला लुटणाऱ्या दोघींना अटक; नाशिकमध्ये गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT