Suicide टिम ई सकाळ
मराठवाडा

Beed Crime | परळीत व्यापाऱ्याची स्वतः च्या दुकानातच गळफास घेऊन आत्महत्या

घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

परळी वैजनाथ (जि.बीड) : येथील अरुणोदय मार्केटमधील गाळा क्रमांक दोनमध्ये असलेल्या गायत्री ग्लास फिटिंगचे व्यावसायिक यांनी दुकानातच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता.१८) सकाळी उघडकीस आली. यामुळे व्यापाऱ्यात खळबळ उडाली आहे. येथील अरुणोदय मार्केटमध्ये प्रवीण प्रभाकर मालेवार (वय ४०) यांचे गायत्री ग्लास फिटिंगचे स्वतः चे दुकान आहे. प्रविण मालेवार यांनी स्वतःच्याच दुकानातील लोखंडी आडूला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. (Trader Hanged Himself In His Shop In Parli Of Beed)

घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कार्यवाही करत आहेत. आत्महत्येची माहिती मिळताच परिसरातील दुकानदारांनी, नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. ही आत्महत्या रात्री झाली का? सकाळी? आत्महत्येचे कारण काय हे पोलीस तपासात उघडकीस येईल.(Beed)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FOREIGN JOB OPPORTUNITIES: या राशींच्या लोकांना मिळू शकते परदेशात जाण्याची संधी; करिअर आणि पैशांसाठी ठरू शकतो मोठा टर्निंग पॉइंट

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Water Scarcity : अंबड तालुक्यात पाणी टंचाईचे सावट: लघु,पाझर तलाव कोरडेठाक तर विहिरी, कूपनलिका ची पाणी पातळी चालली खालावत

CSK Head Coach: जहीर खानकडे चेन्नई सुपर किंग्सची धुरा! IPL 2027 साठी माजी भारतीय स्टारची हेड कोचपदी नियुक्ती, CSKचा मोठा निर्णय

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT