osamanbad news.jpg 
मराठवाडा

तूळजापूर : अंदाज चुकला अन् ट्रक नदीत कोसळला; दोघांचा बुडून मृत्यू     

केशव गायकवाड

इटकळ (जि. उस्मानाबाद) : तुळजापूर तालुक्यातील बाभळगाव येथील पुलावरून ट्रक नदीत कोसळल्याने दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. चालक व क्लिनरचा अपघातात मृत्यू झाला असून गुरुवारी (ता.१३) रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. 

सोलापूर येथील एक ट्रक हैदराबादकडे निघाला होता. या ट्रकमध्ये सुमारे २५ टन साखर भरलेली होती. हैद्राबादकडे निघालेला ट्रक (एमएच १३ सी.व्ही.एल ५५४७) हा राष्ट्रीय महामार्गावर बाभळगाव तलावाच्या जवळ आला. त्याच ठिकाणी एक कार्नर आहे. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूने तलावाचे पाणी आहे. मात्र चालकाला अंदाज आला नसल्याने ट्रक पाण्यात पलटी झाला.

यामध्ये सर्फराज इन्युस शेख (वय२४) व महादेव भिसापती रासकोंडा (वय ४०- रा. विडी घरकुल, कुंभारी, सोलापूर) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. रात्री आठच्या सुमारास हा अपघात घडल्याने अंधारात इटकळ व नळदुर्ग येथील पोलीसांनी स्थानिकांच्या मदतीने अडकलेल्या दोघांचा मृतदेह बाहेर काढला.

रात्री दहाच्या सुमारास नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मोटे व मस्के यांनी इटकळ दूरक्षेत्राचे जमादार व्ही. आर. जाधव, पोलीस एल. बी. शिंदे, मनमत पवार यांनी स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढला. याबाबत नळदुर्ग पोलीस ठाण्यात शुक्रवारी (ता. १४) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास जमादार व्ही. आर. जाधव हे करीत आहेत.

Edit- Pratap Awachar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Funeral News LIVE Updates : केंद्रीय आणि राज्य पातळीवरील नेत्यांकडून अजित पवारांना श्रद्धांजली

Ajit Pawar : जळगावची 'ती' भेट ठरली शेवटची; कामाच्या धडाक्याने जिंकले होते दादांनी मन, आठवणींनी सारेच सुन्न

Ajit Pawar:..अन् शिवकालीन खेळाची कला दिल्लीपर्यंत पोहोचली; उदय यादव यांनी उलगडल्या दादांच्या आठवणी!

Ajit Pawar Bodyguard : पाणावलेल्या डोळ्यांनी चिमुकल्या मुलाने अजित पवारांचे अंगरक्षक विदिप जाधवांना अखेरचा निरोप; व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल

Ajit Pawar : "चोरांना या पॉश लॉकअपमध्ये ठेवले तर".... विश्वासराव नांगरे पाटील यांनी शेअर केली अजितदादांची आठवण

SCROLL FOR NEXT