परभणी एचएआरसी 
मराठवाडा

परभणीत एचआयव्हीग्रस्त बालकांना एचएआरसीकडून दोन घास

कोरोना महामारी, टाळेबंदीच्या काळात महाराष्ट्रातील लोकसहभागातून चालणाऱ्या स्वयंसेवी संस्थेची आर्थिक परिस्थिती बिकट होत चालली आहे.

गणेश पांडे

परभणी : कोरोना संसर्गामुळे लावण्यात (Corona virus) आलेल्या टाळेबंदीचा विपरित परिणाम अनाथ मुलांचा सांभाळ करणाऱ्या संस्थावर होतांना दिसत आहे. पाली ( जि. बीड ) येथील इफॅन्ट इंडिया आनंदग्राम (Ifant india aanandgram) या संस्थेसमोरही संस्थेत दाखल असणाऱ्या ६२ एचआयव्ही एड्सग्रस्त बालकांच्या दररोजच्या उदरभरणाचा मोठा प्रश्न उभा होता. परंतू परभणीतील येथील होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज ( Harc trust) या संस्थेने पुढाकार घेत संस्थेला ४० हजार रुपयांचे किराणा सामान भेट स्वरुपात दिले आहे. (Two grasses from HARC to HIV positive children in Parbhani)

कोरोना महामारी, टाळेबंदीच्या काळात महाराष्ट्रातील लोकसहभागातून चालणाऱ्या स्वयंसेवी संस्थेची आर्थिक परिस्थिती बिकट होत चालली आहे. कारण एक तर टाळेबंदीमुळे संस्थेत भेट देणाऱ्या दात्यांची संख्या कमी व पर्यायाने मदत देखील आटत चालली आहे. त्यामुळे या अनाथ मुलांचे जेवण, पोषक आहार, पालनपोषण आदी बाबींसाठी लागणारा खर्च कसा भागवायचा असा प्रश्न या संस्थांपुढे निर्माण झाला आहे. बीड जवळ पाली गावाजवळ टेकडीवर 'इंफॅन्ट इंडिया' आनंदग्राम नावाची संस्था आहे.

हेही वाचा - रविवारी देखील सकाळी कोरडी हवा ढगाळ वातावरण व पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यानंतर ढगाळ वातावरण होते. दुपारी अडीच ते तीन यावेळी मेघगर्जनेसह पाऊस झाला

जिथे 62 एचआयव्ही एड्सग्रस्त अनाथ बालकांचा सांभाळ दत्ता व संध्या बारगजे हे करतात. नुकतेच त्यांनी समाजमाध्यमावर कोरोना महामारी व टाळेबंदीमुळे निर्माण झालेल्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे सर्वसामान्य दात्यांना मदतीची हाक दिली होती. या हाकेला साद देत परभणीतील होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीजचे अध्यक्ष डॉ. पवन चांडक व सदस्यांनी या संस्थेस 40 हजार रुपयांचे किराणा सामान दिले आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून बसंती सत्यनारायण चांडक यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्य इंफॅन्ट इंडिया (बीड)संस्थेतील मुलांना लागणारे किराणा साहित्य खरेदी करण्यासाठी 11 हजार रुपयांची मदत दिली.

सामाजिक कार्याचा चढता आलेख

'एचएआरसीसंस्थेतर्फे ऑगस्ट 2018 पासून या संस्थेतील 32 किशोरवयीन मुलींना मोफत सॅनिटरी पॅड नियमितपणे देण्यात येत आहे. महाराष्ट्रातील विविध अनाथालयातील मुलींना ओढणी देण्यात आल्या. त्यात सहारा अनाथालय गेवराई, इंफॅन्ट इंडिया बीड, सेवालय प्रकल्प हसेगाव लातूर, पालवी एड्स प्रकल्प पंढरपूर असे मिळून जवळपास 300 मुलींना ओढणी देण्यात आली.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: दुसरी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींनी काय सिद्ध केलं? निवडणूक आयोगाला दिलेला अल्टिमेटम नेमका काय आहे?

Pune Encroachment : शहरातील हजारो चौरस फुटावरील अतिक्रमण हटवले

Teachers Award : १०९ शिक्षकांना राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर; पुणे जिल्ह्यातील सहा शिक्षकांचा समावेश

Ayush Komkar Case : आयुषच्या खूनापुर्वी आरोपींची एकत्रित बैठक; वनराज आंदेकरची पत्नी अटकेत, पुरवणी जबाबात सोनालीचा सहभाग असल्याची माहिती

Latest Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT