corona death.jpg
corona death.jpg 
मराठवाडा

Corona Breaking : उदगीर हादरले; पुन्हा चौघांचा मृत्यू 

युवराज धोतरे

उदगीर (लातूर) : येथील कोरोना रुग्णालयात शुक्रवारी (ता.२४) रोजी सायंकाळच्या सुमारास चौघांचा मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना बळीमुळे उदगीर शहर व परिसर हादरला आहे.

येथील कोविंड रुग्णालयात उपचार घेत असलेल्या गणेश नगर उदगीर येथील साठ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. खडकाळी गल्ली येथील पन्नास वर्षे वय असलेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे. या दोघांचेही अहवाल प्रलंबित आहेत. हळद वाढवणा (ता.जळकोट) येथील ६० वर्षीय तर बापशेट वाडी (ता.मुखेड) येथील ६५ वर्षे पुरुषाचा रुग्णालयात दाखल करत असताना मृत्यू झाला आहे.

दिवसेंदिवस बाधित रुग्णांची संख्या वाढत असून मृत्यूचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक बनले आहे.

सद्या येथील कोरोना रुग्णालयात उदगीर २२५, जळकोट ३, निलंगा २, अहमदपूर ६, मुंबई ३, चाकूर ३, हैदराबाद १, मुखेड ४, देवणी ५, बिदर १ अशा कोरोणाची बाधा झालेल्या २५३ रुग्णांची नोंद झाली आहे. पैकी १८ जणांचा मृत्यू झाला झाला आहे. यापैकी १६० रुग्णांना यशस्वी उपचारानंतर बरे झाल्याने घरी पाठवण्यात आले आहे. अकरा रुग्णांना उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे. सध्या कोविंड रुग्णालयात २५ तर तोंडार पाटी येथील कोविड केअर सेंटर येथे ३२ रुग्णांवर उपचार चालू असल्याची माहिती माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ सतिश हरिदास व कोव्हिड रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ शशिकांत देशपांडे यांनी दिली आहे.

पुन्हा सहा दिवस संचारबंदी
सात ते बारा शनिवारी (ता.२५) ते गुरुवारी (ता.३०} पर्यंत लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदी लागू केली आहे. या सहा दिवसांच्या काळात यावर अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापनांना निर्बंध घातले असून नागरिकांनी संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने  करण्यात आली आहे.

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Josh Baker: क्रिकेटविश्वात शोककळा! इंग्लंडच्या 20 वर्षीय खेळाडूचे निधन, काउंटी संघाने दिली माहिती

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी रायबरेलीतून, तर किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवणार; काँग्रेसची यादी जाहीर

SCROLL FOR NEXT