udgeer.jpg 
मराठवाडा

उदगीरच्या पंचायत समिती सभापतीवर अविश्वास ठराव दाखल

युवराज धोतरे

उदगीर : येथील पंचायत समितीच्या सभापती विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी, शिवसेना व भाजपच्या काही सदस्यांनी लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठराव दाखल केला आहे.

उदगीरचे पंचायत समिती पद हे खुल्या प्रवर्गासाठी आहे. ३० डिसेंबर २०१९ रोजी पंचायत समितीच्या सभागृहात सभापती व उपसभापती यांची निवड झाली होती. १४ सदस्य असलेल्या पंचायत समिती मध्ये भाजपा नऊ, काँग्रेस तीन तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा प्रत्येकी एक असे पक्षीय बलाबल आहे.

३० डिसेंबर रोजी झालेल्या निवड प्रक्रियेत सभापती, उपसभापती यांना भाजपा व महागडीला समसमान प्रत्येकी सात मते मिळाली होती. त्यामुळे चिठ्ठीद्वारे सभापती, उपसभापतीची निवड करण्यात आली होती. त्यात सभापतीपदी भाजपाचे विजय पाटील तर उपसभापती काँग्रेसचे बाळासाहेब मरलापल्ले यांची निवड झाली होती. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना महाआघाडीच्या वतीने बुधवारी (ता.१९) लातूरच्या  जिल्हाधिकारी यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला आहे.

या ठरावावर महाआघाडीच्या पाच त्तर भाजपच्या सहा सदस्यांच्या सह्या असल्याची चर्चा असून एकूण अकरा सदस्यांनी हा ठराव दाखल केला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या अविश्वास ठरावामुळे उदगीरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून घडामोडींना वेग आला आहे. याचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस करत असून जर हा ठराव पारित झाला तर सभापतिपदाची संधी ही राष्ट्रवादीला मिळणार असल्याची चर्चा आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाची प्रतिक्षा
याबाबत लातूरचे जिल्हाधिकारी ठराव दाखल करून घेऊन अविश्वास ठराव पारित करण्यासाठी वेळ देतात. व ही वेळ दिल्यानंतर त्या वेळेत हा ठराव पारित झाल्यास सभापतींना पायउतार व्हावे लागते. त्यामुळे भाजपला झटका बसणार असून जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे.

(संपादन-प्रताप अवचार)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT