corona photo.jpg
corona photo.jpg 
मराठवाडा

Corona : उमरग्य़ात पॉझिटिव्हची संख्या दोन हजारावर!  

अविनाश काळे

उमरगा (उस्मानाबाद) : उमरगा शहर व तालुक्यात कोरोनाचा संसर्ग साडेतीन महिन्यात वाढत गेला. पंधरा दिवसाच्या कालावधीत पॉझिटिव्ह रुग्ण संख्या कमी असल्याचे जाणवत होते. मात्र मंगळवारी (ता.२०) अॅन्टीजेन चाचण्यांचे प्रमाण वाढविल्याने वीस जण पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान संसर्गाचा धोका कमी-अधिक होत असल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचा पर्यायच कोरोनाला दूर ठेवण्यासाठी महत्वाचा ठरणारा आहे. 


उमरगा तालुक्यात गेल्या सहा-सात महिन्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुका प्रशासनामार्फत विविध उपाययोजना केल्या जात आहेत. गेल्या साडेतीन महिन्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत गेला आणि आता त्याच्या संख्येने दोन हजाराचा टप्पा ओलांडला आहे. सर्व प्रथम शहरात संसर्ग वाढत होता आता तो ग्रामीणमध्ये वाढला आहे. सद्यस्थितीत शहरात ९०३ तर ग्रामीण मध्ये एक हजार १०९ संख्या झाली आहे. ५५ रुग्णांचा मृत्यु झालेला असल्याने कोरोनाचा धोका कमी झालेला दिसत नाही. 

एक हजार ७८२ झाले कोरोनामूक्त
आतापर्यंत दोन हजार बारा पॉझिटिव्ह रूग्ण संख्या झाली असुन एक हजार ६१५ जणांनी मोठ्या धैर्याने उपचाराला सामोरे जात कोरोनावर मात केली आहे. सध्या १७५ रुग्ण अॅक्टीव्ह आहेत. उमरगा कोविड रूग्णालयात सोळा, इदगाह कोविड केअर सेंटरमध्ये नऊ, गजानन केअर सेंटरमध्ये एक तर मुरुमच्या केअर सेंटरमध्ये तीन तर पर जिल्ह्यात उपचारासाठी गेलेल्या रुग्णांची संख्या जवळपास पन्नास आहे. होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रूग्णांची संख्याही मोठी आहे.


अन्टीजेन चाचणीत वीस पॉझिटिव्ह

मंध्यतरी रूग्ण संख्या कमी झाल्याचे चित्र होते मात्र मंगळवारी घेतलेल्या अन्टीजेन चाचणीत उमरगा शहरात आठ, तलमोड दोन, माडज एक, बलसूर सात, सुपतगावमध्ये दोन तर मुरुमला दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. चाचण्या वाढल्या तर पॉझिटिव्ह रुग्ण संख्या वाढत असल्याने कोरोनाचा धोका आणखी टळला नसल्याचे चित्र दिसत आहे.


" कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याची स्थिती असली तरी अधिकाधिक संशयित रुग्णांना चाचण्या करुन घेण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणे आवश्यक आहे. शरीरातील ऑक्सीजनचे प्रमाण तपासण्यासाठी पल्स ऑक्सीमीटरचा वापर, मास्कचा वापर व  स्वच्छतेबाबत सतर्कता महत्वाची आहे. परतीच्या पावसाने बदललेले वातावरण आणि येणाऱ्या काळातील हिवाळ्यात संसर्ग वाढू शकतो, त्यासाठी सतर्कतेचा पर्यायच  कोरोनाला दूर ठेऊ शकतो. - विलास तरंगे, प्रभारी तहसीलदार 

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT