kingaon.jpg 
मराठवाडा

किनगाव आरोग्य केंद्राचे 'तीनतेरा', कर्मचाऱ्यांवर जिप अध्यक्षांची कारवाई! 

प्रा. रत्नाकर नळेगावकर

अहमदपूर (जि.लातूर) : अहमदपूर तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रापैकी किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दैनंदिन सर्वाधिक रूग्ण तपासणी होत असते. परिसरातील पंधरा किलोमीटर अंतरावरील गावातील तीन जिल्ह्यातील रूग्ण तपासणीसाठी या आरोग्य केंद्रात येतात. या केंद्रास जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी अचानक भेट दिली. या प्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थिती पाहून अध्यक्ष संतापले. 

पहाणी वेळी मोठ्या स्वरूपात अयोग्य बाबी समोर आल्या. रूग्णालयातील प्रत्येक खोलीचे कोपरे तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकीने रंगवल्याचे निदर्शनास आले. या आरोग्य केंद्रातील कर्मचारी स्वाक्षरी करून कर्तव्य न पार पाडता निघून जाणे. हालचाल नोंद वही  फाटलेल्या अवस्थेत असून त्यांवर चुकीच्या नोंद आढळणे.

 रूग्णाच्या रूममध्ये सिगारेट अर्धवट ओढून टाकलेल्या दिसून येणे. आरोग्य केंद्राच्या एका खोलीत पाणी शुद्धीकरण यंत्राच्या बाजूला मद्याची रिकामी बॉटल आढळणे असा गंभीर प्रकार पाहून संतापलेल्या अध्यक्षांनी या संदर्भात तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांची कानउघाडणी करून सर्व बाबींचा पंचनामा केला. अस्वच्छतेचा कहर पाहून तीन स्वच्छता कर्मचा-यांवर एक वर्षाची वेतनवाढ थांबवण्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना सांगितले. या भेटी वेळी जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे, जिल्हा परिषद सदस्य अशोक केंद्रे, पंचायत समितीचे उपसभापती बालाजी गुट्टे यांची उपस्थिती होती.

(Edited By Pratap Awachar)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT