ravsaheb patil.jpg
ravsaheb patil.jpg 
मराठवाडा

दोन महिने थांबा राज्यात पुन्हा भाजपची सत्ता!  

सकाळ वृत्तसेवा

परभणी : राज्य सरकारमध्ये सहभागी भिन्न विचारांच्या पक्षातील नेत्यामध्ये प्रचंड बेबनाव निर्माण झाला आहे. कुणाचा पायपुस कुणाला नाही. त्यामुळे हे महाविकास आघाडीचे सरकार येत्या दोन महिण्यात कोसळणार आहे. त्यामुळे दोन महिने थांबा राज्यात पुन्हा भाजपचे सरकार स्थापन होईल, असा दावा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सोमवारी (ता.23) परभणीत केला.

मराठवाडा पदवीधर मतदार संघातील भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्राचारार्थ सोमवारी येथील अक्षदा मंगल कार्यालयात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेस विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, आमदार मेघना बोर्डीकर,  माजी आमदार मोहन फड, महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, अभय चाटे, माजी आमदार रामराव वडकुते, समीर दुधगावकर आदींची उपस्थिती होती.

श्री. दानवे म्हणाले, मराठवाडा पदवीधर मतदार संघावर भाजपचा उमेदवार तीन वेळा निवडून आला आहे. (कै.) गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाचा उल्लेख करीत त्यांच्या मुळेच हा मतदार संघ भाजपच्या ताब्यात राहिला. दोन वेळा जयसिंगराव गायकवाड व एक वेळा श्रीकांत जोशी यांनी मतदार संघाचे नेतृत्व केलेले आहे. त्यामुळे या मतदार संघात भाजपचा मतदार आहे हे सिध्द होते. परंतू गोपीनाथरावांच्या निधनानंतर हा मतदार संघ आपल्या हातून गेला असल्याचे सांगत त्यांनी परत तो मतदार संघ आता आपण ताब्यात घेतला पाहिजे असे आवाहन उपस्थितांना केले.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर बोलतांना श्री. दानवे यांनी या सरकारमध्ये सहभागी भिन्न विचारांच्या पक्षातील नेत्यामध्ये प्रचंड बेबनाव निर्माण झाला आहे. कुणाचा पायपुस कुणाला नाही. त्यामुळे हे सरकार येत्या दोन महिण्यात कोसळणार आहे. अनेक आमदार भाजपात येण्यासाठी इच्छुक असून आगे आगे देखो होता है क्या, असेही सांगत त्यांनी या सरकारची खिल्ली उडविली आहे. जुळवाजुळव झाली आहे, आता दोन महिन्यात राज्यात भाजपचे सरकार स्थापन होणार आहे. असा दावाही त्यांनी केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांसाठी पदवीधर ही निवडणूक अत्यंत महत्वाची ठरणार आहे. राज्यातील जनतेला भाजपच हवे आहे, ते या निवडणुकीतून परत सिध्द होईल असे ते म्हणाले.

सतीश चव्हाणने एक तरी ठळक काम दाखवावे 
राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार आमदार सतीश चव्हाण यांनी गेल्या 12 वर्षात पदवीधरांसाठी केलेले एक काम दाखवावे. 12 वर्षापैकी सात वर्ष त्यांची सत्ता होती. या सात वर्षात तरी त्यांनी केलेले एक ठळक काम दाखवावे असे सांगत सतीष चव्हाणांनी एकही प्रश्न विधान भवनात मांडला नाही. त्यामुळे त्यांना पदवीधरांच्या प्रश्नाची जाण नाही असा आरोप त्यांनी केला. श्री. दरेकर म्हणाले, पदवीधऱ मतदार संघाची ही निवडणुक राज्याची दिशा बदलणारी ठरणार आहे. भाजपचे राज्यात चांगले जाळे निर्माण झालेले आहे. या जाळ्याचा पुरेपुर उपयोग करून घेतला पाहिजे. पक्षाने सुक्ष्म नियोजन केले आहे त्यानुसार कार्यकर्त्यांनी स्वताच्या बुथवर किती आघाडी मिळविता येईल त्याचे नियोजन करून काम करावे असे आवाहन त्यांनी केले.

(Edited By Pratap Awachar)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : NEET परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना प्रॉक्सी उमेदवार पुरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT