file photo  
मराठवाडा

नांदेड जिल्ह्यातील या २६ गावात रंगणार ‘जल पे चर्चा’

शिवचरण वावळे

नांदेड : महाराष्ट्र व्हिलेज ट्रान्सफॉर्मेशनने (एमव्हीएसटीएफ) स्वच्छ पिण्याचे पाणी आणि स्वच्छता या सुविधा पुरवण्यासाठी संशोधनाला अनुसरून काम करणाऱ्या अॅक्वाक्राफ्ट या कंपनीच्या सहकार्याने ‘जल पे चर्चा’ या अभियानाला सुरुवात केली आहे. नांदेड जिल्ह्यातील २६ गावात या अभियानावर चर्चा रंगणार आहे.

जल जीवन मिशन आणि जल शक्ती अभियानाच्या माध्यमातून तरुणांमध्ये पाणी बचतीबाबत जनजागृती करणे हा या अभियानाचा मूळ उद्देश आहे. ग्रे वॉटर मॅनेजमेंट व पाणी बचतीच्या इतर उपायांच्या सहाय्याने पाण्याचे नवे स्रोत तयार करणे, त्यांचे संवर्धन करणे आणि जलस्रोतांची वाढ या विषयावर अभियानाच्या माध्यमातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न एमव्हीएसटीएफने केला आहे. त्याचबरोबर जल बचतीबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृतीही केली जाणार आहे. एमव्हीएसटीएफचे हे अभियान नांदेडसह २५ जिल्ह्यांतील ९८ तालुक्यांमध्ये राबवले जाणार आहे.

नांदेडमधील या गावांचा समावेश
जिल्ह्यातील अंबाडी तांडा, अंध बोरी गौरी धामणधरी, प्रधान सांगवी, दिगडीम, कनकवाडी, वजरा, टाकराळा, टेंभी, पारवा, तांदळी, हंगरगा, फुटकळवाडी, बेनाळ, सावरमाळ, राम नाईकतांडा, मोहिजा, हनुमंतवाडी, बामणी, वाळकेवाडी, टेळकी, कारेगाव आणि पारडी या २६ गावात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

हेही वाचा- शिवसेनेने प्रस्ताव दिल्यास आम्ही सरकार स्थापन करण्यास तयार : सुधीर मुनगंटीवार

पाणी बचतीचे महत्त्व तरुणांमध्ये रुजावे
जिल्हास्तरावर तरुणांना आवडणाऱ्या अनेक कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांच्यात जलशक्ती अभियानाची (जेएसए) माहिती देणे हा या अभियानचा मुख्य उद्देश आहे. ग्रामपरिवर्तक (सीएमआरडीएफ) आणि जिल्हा एक्झिक्युटिव्ह या विषयावरील त्यांची मते आणि जलशक्ती अभियानाअंतर्गत (जेएसए) करण्यात आलेली कामे, आव्हाने आणि या अभियानाचा काय फायदा झाला या गोष्टी सर्वांसमोर मांडणार आहेत. अभियानाची जनजागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांना शैक्षणिक माहितीपट दाखवण्यात येणार आहे. मुक्त संवादाच्या कार्यक्रमाबरोबरच प्रश्न मंजूषाही आयोजित करण्यात आल्या आहेत.

हेही वाचलेच पाहिजे- चीनहून आलेल्या ‘त्या’ विद्यार्थ्याची आरोग्य तपासणी काय आहे कारण? वाचा सविस्तर...


एमव्हीएसटीएफचा पुढाकार
जलशक्ती अभियानातील तत्त्वांना अनुसरून पाणी पुरवठा व स्वच्छता या विषयांवर आधारित अभियान एक हजार गावांमध्‍ये राबवण्यासाठी प्राथमिक काम आणि तांत्रिक सर्वेक्षणासाठी एमव्हीएसटीएफने कष्ट केले आहेत. त्यामुळे सध्याची गरज लक्षात आली असून ही सर्व माहिती भारतातील पहिला डिजिटल सोशल एक्सचेंज प्लॅटफॉर्म www.swachhagraha.com उपलब्ध करून देण्यात आली आहे.


Remarks :

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शहांचा निरोप चंद्रकांत दादांनी मोहोळना दिला, जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द; शिंदेंना शब्द दिल्यानं धंगेकर गप्प, काय घडलं?

अखेर जैन बोर्डिंगचा जमीन खरेदी व्यवहार रद्द, गोखले बिल्डर्सचा मोठा निर्णय

Female Doctor Case: हे तर गलिच्छ राजकारण, महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी रणजितसिंह यांनी मुख्यमंत्र्यांसमोरच सांगितलं..

Panchang 27 October 2025: आजच्या दिवशी मंगल चंडिका स्तोत्र पठण व ‘अं अंगारकाय नमः’ या मंत्राचा जप करावा

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT