Facts Behind Corona Vaccination Osmanabad News 
मराठवाडा

कोरोना लस घेतल्यानंतर पुन्हा होऊ शकतो कोरोना? काय आहे वास्तव, जाणून घ्या

सयाजी शेळके

उस्मानाबाद : कोरोनावरील लस घेतल्यानंतर कोनोनाची लागण होते का? जर लागण होत असले तर कशासाठी कोरोनाची लस घ्यायाची? असे अनेक प्रश्न सामान्य नागरिकांच्या मनामध्ये येतात. मात्र कोरोनाची लस घेतल्यानंतरही काही बाबतीत काळजी घेणे गरजेचे आहे. शिवाय जिल्हाधिकाऱ्यांनाही लस घेतल्यानंतर कोरोना झाला असून कशी काळजी घ्यावी, याबाबत आवाहन केले आहे. लस घेतल्यानंतर कोरोना होऊ शकतो का? यावर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे यांनी सांगितले की, कोरोनावरील लस घेतली म्हणजे नेमके काय होते. तर लस घेतल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास सुरुवात होते.

ज्यांनी लस घेतली त्यांच्या शरीरामध्ये हळूहळू अँटीबॉडीज तयार होतात. म्हणजेच आपल्या शरीराच्या संरक्षणासाठी शरीरातच पोलिस यंत्रणा तयार होते. त्यामुळे कोरोना विषाणुच्या विरोधात लढण्यासाठी आपल्या शरीरात मोठे बळ तयार होते. परिणामी कोरोनाचा फारसा प्रादुर्भाव शरीरामध्य होत नाही. कोरोनामुळे माणसांच्या जीविताला धोका होऊ शकतो. तो कोरोनाची लस घेतल्यानंतर कमी होतो. त्यामुळे प्रत्येकाने लस घेणे गरजेचे आहे. जे कर्मचारी नियमितपणे नागरिकांच्या संपर्कात येतात. त्यांनी तर लस घेणे अनिवार्य आहे. लस घेतली म्हणजे कोरोना होत नाही, असे नव्हे. तर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. परिणामी शरीरात कोरोना ससंर्गाचा फैलाव शरीरात फारसा वाढत नाही. माणसांच्या जीविताला होणारा धोका कमी होतो.

वाचा - कोरोनाची लस घेतल्यानंतरही उस्मानाबादचे जिल्हाधिकारी दिवेगावकर कोरोना पाॅझिटिव्ह

लस घेतल्यानंतरची त्रिसूत्री
लस घेतल्यानंतरही आपल्याला काही नियम पाळावे लागणार आहेत. त्यासाठी प्रत्येकाने मास्क वापरणे गरजेचे आहे. मात्र हल्ली मास्क वापरण्यास टाळाटाळ केली जात आहे. मास्क न वापरण्याचे गांभीर्य अद्यापही नागरिकांना कळलेले नाही. मास्क वापरणे अनिवार्य आहे. शिवाय बाहेरून आल्यानंतर साबणाने हात स्वच्छ धुणे गरजेचे आहे. तसेच वारंवार हात सॅनिटाइज करावे लागणार आहेत. याशिवाय गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.


जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. लस घेतल्यानंतर करोनाची लागण झाल्याने नागरिकांमध्ये गैरसमज पसरू नये. यासाठी त्यांनी आवाहन केले असून लस घेणे गरजेचे आहे. असे म्हटले आहे. लस घेतल्याने कोरोनाचा फारसा प्रादुर्भाव दिसत नाही. शिवाय लस घेतल्यानंतरही नियम पाळावे लागणार असल्याचे आवाहन त्यांनी केले आहे. लस घेतली तरी तोंडाला मास्क लावणे गरजेचे आहे. वारंवार सॅनिटायझर वापरणे आवश्यक असल्याचेही जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी निवेदनाद्वारे कळविले आहे.


संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT