Osmanabad Crime News esakal
मराठवाडा

गावठी कट्ट्याची गोळी लागून महिला गंभीर जखमी, उस्मानाबादेतील धक्कादायक घटना

सध्या गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बालाजी माणिकवार

तुरोरी (जि.उस्मानाबाद) : येथील राष्ट्रीय महामार्गावरील ज्ञानेश्वर श्रीमंत जाधव यांच्या घराजवळ देशी कट्ट्यातून गोळी लागून पूजा सागर जाधव (वय २५) ही महिला गंभीर जखमी झाली आहे. ही घटना शुक्रवारी (ता.१८) रात्री उघडकीस आली. या घटनेविषयी पोलिसांनी सांगितले कि, ज्ञानेश्वर जाधव यांचे घर राष्ट्रीय महामार्गावर आहे मंगळवारी (ता.१५) सायंकाळी त्यांची सून पूजा घरासमोरील अंगणात कचरा झाडत असताना तिला पिस्तूल नजरेस पडले. त्यावेळी तिला ते पिस्तूल खेळण्यातील असल्यासारखे वाटले व ते हातात घेऊन पाहत असताना अचानक व अनावधानाने गोळी झाडली गेली व गोळी छातीखाली पोटात लागून पूजा गंभीर जखमी झाल्या आहेत. (Woman Injured In Country Side Gun Firing In Turori Village Of Osmanabad)

त्यांच्यावर सोलापूर येथील यशोधरा हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. सदरील घटना घडून चार दिवस उलटून गेल्यानंतर याचा सुगावा पोलिसांना लागल्याने पोलिस हवालदार वाल्मिक कोळी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तिविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते यांनी धाव घेऊन चौकशी सुरू केली आहे. घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक महेश क्षीरसागर, एस.बी. बरकते, पोलिस पाटील प्रशांत पाटील यांच्यासह मोठा फौज फाटा दाखल झाला आहे.(Osmanabad)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT