file photo 
मराठवाडा

Video: बस पाहाताच मजूरांच्या आनंदाला पारावर ;१८ बसद्वारे मध्यप्रदेशकडे रवाना

कैलास चव्हाण

परभणी : परभणी जिल्ह्यात कामानिमित्त आलेल्या आणि लॉकडाउनमध्ये अडकून राहीलेल्या मध्यप्रदेशातील ४२४ मजुरांना सोमवारी (ता. ११) परभणी, गंगाखेड, पाथरी व जिंतूर आगारातून रवाना करण्यात आले. एकूण १८ बस सोडण्यात आल्या आहेत. बस चढताना या मजुरांच्या चेहऱ्यावर गावाकडे जाण्याची ओढ आणि हस्य दिसून येत होते.

परभणी, गंगाखेड, पाथरी या भागात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय मजूर कामाला आहेत. बांधकाम, दालमिल, सिमेंट, जिनिंग उद्योग आदी क्षेत्रात हे मजूर काम करत होते. लॉकडाउनमुळे या मजुरांची उपासमार सुरू झाली होती. कामही नाही अन् खाण्यासाठी काही नाही. तसेच भाषा, माहितीच्या अभावामुळे मजुरांचे हाल सुरू झाले होते. आता अडकलेल्या मजुरांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्याची सोय राज्य परिवहन मंडळाने केली आहे. त्यासाठी नोंदणी करण्यात येऊन बस व्यवस्था करण्यात आली. सोमवारी (ता. ११) पहिल्या टप्प्यात एकाच दिवशी चारही आगारांतून बस धावल्या आहेत.

सीमेवर सोडण्यात येणार
परभणी येथील बसस्थानावरून चार बस सोडण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रत्येक बसमध्ये २२ या प्रमाणे १०५ मजुरांना बसविण्यात आले. तसेच परभणी आगाराअंतर्गत पूर्णा येथून तीन बस सोडण्यात आल्या. त्यामध्ये ६६ मजुरांचा समावेश आहे. या मजुरांना धुळे जिल्ह्यातील शिरपूरजवळील मध्यप्रदेशातील बडवनी जिल्ह्याच्या सीमेवर सोडण्यात येणार आहे. सकाळी नऊ वाजता या बस रवाना झाल्यात. या वेळी उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कुंडेटकर, परभणीचे प्रभारी तहसीलदार श्री. कदम, नायब तहसीलदार रामदास कोलगणे, विभागनियंत्रक मुक्तेश्वर जोशी, आगार प्रमुख दयानंद पाटील यांची उपस्थिती होती.


 गंगाखेडातून ४८ मजूर रवाना
 गंगाखेड येथील जिनिंगमध्ये काम करण्यासाठी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आदी ठिकाणांहून मजूर आले होते. त्या ४८ मजुरांना गंगाखेड बस आगारातून तीन लालपरी रवाना झाल्या. त्यामध्ये गंगाखेड शहरातील ३९, पालममधील एक आणि सोनपेठमधील आठ, अशा ४८ मजुरांचा समावेश आहे. या मजुरांना जेवण व पाण्याची व्यवस्था तहसील प्रशासनाकडून करण्यात आली. धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील मध्यप्रदेशच्या सीमेवर या मजुरांना  लालपरी सोडणार असल्याची माहिती आगारप्रमुख आनंद धर्माधिकारी यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.


हेही वाचा :​ जुगारावर छापा; अडीच लाखांचा मुदेमाल जप्त

जिंतूर आगाराने सोडल्या पाच बस
जिंतूर आगारातूनदेखील सोमवारी पाच बस मजुरांना घेऊन रवाना झाल्या आहेत. त्यामध्ये जिंतूर अंतर्गत सेलू बसस्थानक येथून चार बसद्वारे ११४ मजूर मध्यप्रदेशकडे रवाना करण्यात आले आहेत. तर जिंतूर बसस्थानाकमधून एका बसमधून २० मजूर निघाले आहेत.

पाथरीतून ७१ मजूर रवाना
पाथरी येथील आगारातून सोमवारी तीन बस सोडण्यात आल्या. त्यामध्ये पाथरी येथील ४५ आणि मानवत येथील २६ मजुरांचा समावेश आहे. अशा एकूण ७६ मजुरांचा समावेश आहे.

विशेष व्यवस्था
मजुरांना घेऊन जाणाऱ्या सर्व बसचे आधी निर्जंतुकीकरण करण्यात आले होते. तसेच बसमध्ये जाण्याआधी सर्व प्रवाशी मजुरांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच सॅनिटाझरचा वापर करूनच 
आतमध्ये सोडण्यात आले. त्यांच्यासोबत पाणी, भोजनाची व्यवस्था करण्यात आली. बसमध्ये चढताना सर्वच मजुरांच्या चेहऱ्यावर घराकडे जाण्याची ओढ आणि हस्य दिसून आले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT