jalna.jpg 
मराठवाडा

Breaking : जालना जिल्ह्यात दुचाकी ट्रकला धडकली; युवकाचा जागेवरच मृत्यू 

बाबासाहेब गोंटे

अंबड (जि. जालना) : अंबड जालना महामार्गावरील शेवगा फाटयावर बुधवारी (ता.२२) दुपारी दीड वाजेच्या दरम्यान अंबड शहराकडून जालन्याकडे दुचाकी क्रमांक एम एच २१ ऐवाय  ९०७५ वरून जात असताना शेवगा फाट्यावर उभा असलेल्या मालट्रक क्रमांक केऐ ५६-४७३७ ला धडकून युवकाचा मृत्यू झाला आहे. लोणगाव पोस्ट टेंभुर्णी (ता. जाफराबाद) येथील शुभम रामेश्वर साळवे (वय २५) हा जागीच ठार झाला.

हा अपघात झाल्यानंतर जवळच असलेल्या सचिन आखाडे, धनंजय रसाळ, लक्ष्मण जाधव, जगन्नाथ तिडके, राम जाधव, रवी कुटे, विकास आध्ये यांनी मदतीसाठी धाव घेतली. मात्र दुर्दैवाने शुभम साबळे जागीच गतप्राण झाला होता. या घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक भारत बलय्या, पोलिस हेड नाईक सतिष देशमुख, नारायण शेळके यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. 

पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने रुग्णवाहिकेत मृतदेह टाकून अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी दाखल करण्यात आला आहे. मयत शुभम याच्या अपघाताची बातमी समजताच त्याच्या कुटूंबातील सदस्यांनी धाव घेतली. या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

(संपादन : प्रताप अवचार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election 2026 : 'गोकुळ निवडणूक बिनविरोधसाठी प्रस्ताव नाही, आम्ही सर्व जागा लढवणार'; सतेज पाटलांची मोठी घोषणा, 'महायुती'वरही साधला निशाणा

Kagal Woman Dead Body : कागलमध्ये हाय व्होल्टेज टॉवरला महिलेचा मृतदेह; अनोळखी महिलेने ओढणीने गळफास घेतल्याचा प्राथमिक अंदाज

'धाकट्या सुनबाई' मध्ये दिसणार लोकप्रिय इन्फ्लुएन्सर; कोण आहे ती? 'अशी' आहे झी मराठीच्या नव्या मालिकेची कथा

Latest Marathi News Live Update : अनंत चतुर्दशीच्या दिवशी ॲक्वा मेट्रो लाईन ३ रात्रभर सुरू ठेवण्यात येणार

Pune MLC Election 2026 : महाविकास आघाडीचे ठरले! पदवीधरची जागा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला, तर शिक्षक मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडेच..; कोणाला मिळणार संधी?

SCROLL FOR NEXT