airport screeing 
मुंबई

'वंदेभारत' अभियानातून चार हजार प्रवासी राज्यात दाखल; जूनअखेर आणखी 38 उड्डाणे

सकाळवृत्तसेवा

मुंबई : परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी वंदे भारत अभियान राबविण्यात आले आहे. त्यानुसार राज्यामध्ये 30 विमानांद्वारे 19 देशांतील 4013 नागरिक राज्यात सुखरूप पोहचले आहे. या सर्वांना सध्या क्वारंटाईन करण्यात आले असून त्यानंतर त्यांना घरी जाण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे.

राज्यात आलेल्या एकूण नागरिकांमध्ये 1309 नागरिक मुंबईच्या विविध भागातील रहिवाशी आहे; तर 1619 नागरिक राज्यातील विविध जिल्ह्यातील आहे. त्यासोबतच इतर राज्यातील नागरिकांची संख्या 1013 इतकी आहे. या नागरिकांना ब्रिटन, सिंगापूर, फिलीपाईन्स, अमेरिका, बांग्लादेश, मलेशिया, कुवेत इथियोपिया, अफगानिस्तान, ओमान, दक्षिण आफ्रीका, इंडोनेशिया, नेदरलँड, जपान, श्रीलंका, म्यानमार, टाँझानिया, स्पेन, आर्यलँड या देशातून आणण्यात आले आहे. 

अतिरिक्त 38 फ्लाइर्टसचे नियोजन
वंदे भारत अभियान टप्पा 3 अंतर्गत एअर इंडियाने 30 जूनपर्यंत 38 विमानांचे नियोजन केले असून या मिशनअंतर्गत अतिरिक्त चार्टर विमानांची ही व्यवस्था करण्यात आली आहे. ज्यात अमेरिका, रशिया, मध्य आशिया, युरोप आणि आखाती देशांमधून मोठ्या प्रमाणात मागणी असलेल्या उड्डाणांचा समावेश आहे. दोहा येथून पुढील सात दिवसात 3 चार्टर विमानांच्या सहाय्याने खाडीमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले जाईल. ऑस्ट्रेलियासाठी वंदेभारत अभियानांतर्गत फ्लाईट उपलब्ध करून देण्याबाबत विदेश मंत्रालयाकडे मागणी करण्यात आली आहे. 

आलेल्या प्रवाशांचे क्वारंटाईन
बृहन्मुंबईतील प्रवाशांसाठी संस्थात्मक अलगीकरणाची सुविधा विविध हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे. इतर जिल्हयातील व राज्यातील प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठविण्याची व्यवस्था जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगरमार्फत करण्यात येत आहे. त्यांना त्यांच्या जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्तांमार्फत अलगीकरण केले जात आहे.  हे अभियान केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय आणि केंद्रीय गृह मंत्रालयाच्या समन्वयाने राज्य सरकार यशस्वीरित्या पार पाडत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोलापूरला दररोज पाणीपुरवठा! नव्याने टाकली जाणार ७१५ किमी पाइपलाइन; १५ ते ३२ लाख लिटरचे असतील २९ जलकुंभ; ८९२ कोटींपैकी २०० कोटी रोख्यातून उभारले जाणार

Morning Breakfast Recipe: हिवाळ्यात सकाळच्या नाश्त्यात मुलांसाठी बनवा 'हे' 2 इन्स्टंट पदार्थ, लगेच नोट करा रेसिपी

संचमान्यतेपूर्वी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची बोगस नोंदणी! मधूनच शाळा बदललेल्या विद्यार्थ्यांची होणार पडताळणी; इयत्ता अकरावी-बारावीसाठी बायोमेट्रिक हजेरीचे बंधन

Messi in Mumbai: अमृता फडणवीस यांनाही नाही आवरला मेस्सीसोबत सेल्फी घेण्याचा मोह... Video Viral

महापालिकेचा याच आठवड्यात वाजणार बिगुल! भावी नगरसेवकांकडून त्यांच्या प्रभागात आरोग्य शिबिरे, महासेवा शिबिरांसह ‘होम मिनिस्टर’चे डिजिटल फलक, वाचा...

SCROLL FOR NEXT