87 हजार आरोग्य कर्मचारी कोरोनाग्रस्त; आयएमएच्या 500 हून अधिक डॉक्‍टरांचा मृत्यू 
मुंबई

87 हजार आरोग्य कर्मचारी कोरोनाग्रस्त; आयएमएच्या 500 हून अधिक डॉक्‍टरांचा मृत्यू

भाग्यश्री भुवड

मुंबई : कोरोनाकाळात रुग्णसेवा बजावताना देशभरातील तब्बल 515 डॉक्‍टरांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. यामध्ये 292 डॉक्‍टर हे महाराष्ट्रातील आहेत; तर 87 हजार आरोग्य कर्मचारी कोरोनाग्रस्त झाले आहेत. यात खासगी डॉक्‍टर, परिचारिका, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे; मात्र या सर्व कोव्हिडबाधित डॉक्‍टरांची नोंद सरकारने केलेली नाही. याशिवाय सरकारी रुग्णालयातील किती आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे, याबाबतची माहिती समोर आली नसल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले आहे. 


कोरोना रुग्णांची सेवा करताना झालेल्या संसर्गामुळे या डॉक्‍टरांचा मृत्यू झाला असून, यातील केवळ 62 डॉक्‍टरांच्या कुटुंबीयांनाच सरकारने जाहीर केलेल्या विम्याचा लाभ मिळाला आहे, अशी माहितीही आयएमएने दिली आहे. देशभरातील 1 हजार 746 शाखांमधून मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या डॉक्‍टरांचीही आकडेवारी समोर आली आहे. हे सर्व ऍलोपॅथी शाखेतील डॉक्‍टर आहेत. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या डॉक्‍टरांची संख्या यापेक्षाही अधिक असण्याची शक्‍यता आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजन शर्मा यांनी व्यक्त केली. 

आतापर्यंत देशभरातील 87 हजार वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. पंतप्रधान मोदींनी कोव्हिड योद्‌ध्यांसाठी जाहीर केलेल्या विमा योजनेचा लाभ 515 पैकी केवळ 62 डॉक्‍टरांना मिळाला आहे. अजूनही 130 विमा प्रतीक्षेत आहेत. अजूनही काही राज्यांकडून विम्यासाठीची सर्व कागदपत्रे आलेली नाहीत. केंद्र सरकारने डॉक्‍टरांच्या माहितीचा डेटाबेस तयार करायला हवा. 
- डॉ. राजन शर्मा, राष्ट्रीय अध्यक्ष, आयएमए 

सद्यस्थितीत देशभरात 87 हजार आरोग्य कर्मचारी कोरोनाबाधित आहेत. त्यातील 572 जणांचा मृत्यू झाला आहे. 572 मधील 50 टक्के कर्मचारी महाराष्ट्रातील आहेत; तर देशात 515 डॉक्‍टरांचा मृत्यू झाला आहे. 
- डॉ. अविनाश भोंडवे, अध्यक्ष, आयएमए (महाराष्ट्र) 

- देशात 194 रुग्णांमागे एक डॉक्‍टर असे प्रमाण आहे. 

वयोगट मृत्यू झालेले डॉक्‍टर 
70 हून अधिक 66
60 ते 70 201
50 ते 60 171 
35 ते 50 59 
35 हून कमी 18 

---------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रामनवमीची मिरवणूक अन् खुनशी राग! पुण्यात भरदिवसा तरुणाला संपवण्याचा प्रयत्न; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ समोर

PSL Controversy: PSLमध्ये मोठा ड्रामा! फखर जमानकडून 'बॉल टॅम्परिंग'? पीसीबीने हायलाईट्समधून पुरावेच हटवले

गायत्रीच्या केळवणाची बातचं न्यारी! फिश फ्राय, मोदक, पुरणपोळी आणि बरंच काही, Video शेअर करत म्हणाली...

Latest Marathi News Live Update : नवी मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार

Ashok Kharat Case : नीलम गोऱ्हे देखील अशोक खरातकडे भविष्य पाहायला जायच्या; तृप्ती देसाईंच्या आरोपाने खळबळ

SCROLL FOR NEXT