maharashtra police
maharashtra police 
मुंबई

मोठी बातमी : मुंबईतील नऊ पोलिस उपायुक्तांच्या पुन्हा बदल्या...

अनिश पाटील

मुंबई : मुंबईत उपायुक्तांच्या बदलीवरून राजकीय वातावरण तापले असताना आता पुन्हा त्याच अधिकाऱ्यांच्या थोड्या बहुत फरकाने पुन्हा बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश शुक्रवारी पोलिस आयुक्त(प्रशासन) यांच्या कार्यालयाकडून जारी करण्यात आले. नव्या आदेशानुसार नऊ उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

देशांत कोरोनाचे संकट गडद असतानाच यावर्षी पोलिस दलाच्या कोणत्याही प्रकारच्या बदल्या करण्यात येणार नसल्याचे सरकारने कळविले होते. त्यातच मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वााढत असून अनेक ठिकाणी पोलिसांनी अनावश्यकरित्या बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना अटकाव करीत पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. अशा काळात गेल्या आठवड्यात दहा उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या, तर दोन उपायुक्तांना  प्रतिनियुक्तीवर दिल्लीत पाठवण्यात आले होते. 

बदली आदेशातनंतर काही अधिकाऱ्यांनी नव्या ठिकाणी पदभारही स्वीकारला होता. तर काही अधिकारी नाराज असल्याने त्यांनी पदभार स्वीकारला नव्हता. अशा काळात रविवारी या सर्व बदल्या रद्द झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. मुख्यमंत्री व गृहमंत्री कार्यालयांना विश्वासात न घेता बदल्या करण्यात आल्यामुळे या रद्द करण्यात आल्याचे सरकारच्यावतीने जाहीर करण्यात आले होते. पण प्रत्यक्षात यामागे रायकीय वाद असल्याचे बोलले जाते.  

त्यानंतर  सर्व पोलिस उपायुक्तांना पुन्हा पूर्वीच्या ठिकाणी पदभार स्वीकारण्यास सांगितले आहे. रविवारी रद्द झालेल्या या बदल्यानंतर पाच दिवसांनी शुक्रवारी मुंबई पोलिस दलातील उपायुक्तांच्या बदलीची नवी यादी जारी करण्यात आली. त्यात नऊ उपायुक्तांची बदली करण्यात आली आहे. त्याशिवाय उपायुक्त(अभियान) पदाचा अतिरिक्त भार विशेष शाखा-1च्या उपायुक्तांकडे देण्यात आला आहे. तसेच संरक्षण व सुरक्षा विभागाच्या उपायुक्तांचा अतिरिक्त पदभार उपायुक्त गुन्हे(प्रतिबंध) यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला आहे.


नव्याने जारी करण्यात आलेली बदल्यांची यादी

उपायुक्त पूर्वीचे पद बदलीचे ठिकाणं
परमजीत सिंग दहिया परिमंडळ 7 परिमंडळ 3
प्रशांत कदम संरक्षण परिंमंडळ 7
गणेश शिंदे विशेष कक्ष 1 बंदर परिमंडळ
डॉ. रश्मी करंदीकर बंदर परिमंडळ सायबर विभाग
शहाजी उमाप गुन्हे शाखा विशेष शाख 1
डॉ. मोहन दहिकर परिमंडळ 11 सशस्त्र पोलिस दल(ताडदेव)
विशाल ठाकूर सायबर परिमंडळ11
प्रणय अशोक ऑपरेशन परिमंडळ 5
नंदकुमार ठाकूर सशस्त्र पोलिस(ताडदेव) गुन्हे शाखा(अन्वेषण)

---

संपादन : ऋषिराज तायडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचे गोलंदाज चमकले! चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरातला 147 धावांवरच केलं ऑलआऊट

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

Latest Marathi News Live Update: नारायण राणेंकडे प्रश्न सोडवण्याची हातोटी- राज ठाकरे

SCROLL FOR NEXT