Aditya Thackeray shiv sanwad yatra  Sakal
मुंबई

राजकारण जमलं नाही हेच आपलं चुकलं; संवाद यात्रेत अदित्य ठाकरेंचं भावूक विधान

20 जून 20 जुलै महिनाभर महाराष्ट्रात दुःखाचे वातावरण - आदित्य ठाकरे

सकाळ डिजिटल टीम

20 जून 20 जुलै महिनाभर महाराष्ट्रात दुःखाचे वातावरण - आदित्य ठाकरे

महाराष्ट्रात काही काळापासून क्लेशदायक वातावरण सुरू आहे. राज्यात सुरु असणारी सर्कस राजकारण म्हणून न पटणारी आहे. राज्यात सगळं सुरळीत सुरु असतानाही या बंडखोरांनी पाठीत खंजीर का खुपसला, असा सवाल करत शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. आज ते भिवंडीतील शिवसंवाद यात्रेदरम्यान बोलत होते. यावेळी संवाद साधताना त्यांनी राजकारण जमलं नाही हेच आपलं चुकलं असं भावूक विधान केलं आहे.

या संवाद यात्रेदरम्यान बोलत असताना आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला. ते म्हणाले, जे गेले त्यांच्या रक्तात शिवसेना कधीच नव्हती. आपल्या खासदार, आमदारांवर लक्ष ठेवण्याऐवजी विश्वास ठेवला हेच आपले चुकले. या बंडखोरांनी कोणताही उठाव केलेला नाही, त्यांनी गद्दारीच केली आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार लवकरच कोसळणार आहे, असं सूचक वक्तव्यही आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.

पुढे शिंदे सरकारवर आरोप करत ठाकरे म्हणले, शिवसैनिकांना धमक्या दिल्या जात आहेत. उद्धव ठाकरे आजारी असताना ही बंडाची तयारी सुरू झाली होती. त्यामुळे हा कोणताही उठाव नाही ही गद्दारीच आहे असा घणाघातही आदित्य ठाकरे यांनी केला आहे. पुढे ते बंडखोरांना म्हणाले, तुम्हाला कुठे रहायचं असेल तिथे रहा. मात्र आमदाराकीचा राजीनामा देऊन निवडणुकीला समोरे या, त्यावेळी जे काही जनता ठरवेल ते शिवसेनेला मान्य असेल. ज्याला कुणाला परत यायचं असेल त्याच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे खुले आहे. तुम्ही कधीही येऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Kannad Nagarparishad Election : कन्नडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांचा युतीचा फॉर्म्युला ठरला; जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांची माहिती

Dharur Nagarparishad Election : धारूर नगरपरिषदेत चौरंगी लढत रंगणार! अध्यक्षपदासाठी १६, तर नगरसेवक पदासाठी तब्बल १५१ नामनिर्देशन पत्र दाखल

Latest Marathi Breaking News: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Drone Delivery Service: दूध, किराणा, पॅकेजेस… सगळं थेट ड्रोनने घरी पोहोचणार! मुंबईत पहिली निवासी ड्रोन डिलिव्हरी सेवा सुरू होणार, पण कधी?

SCROLL FOR NEXT