Aditya Thackeray addressing media, raising concerns over BJP's leadership and criticizing MP Nishikant Dubey for his controversial statements.  esakal
मुंबई

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

Aditya Thackeray slams BJP : ‘’ज्यांनी हिंदूंचा नरसंहार केला, तोसुद्धा भाजप सरकारच्या अपयशामुळे’’ असाही गंभीर आरोप केला आहे.

Mayur Ratnaparkhe

Aditya Thackeray Questions BJP’s Integrity : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपवर पुन्हा एकदा जोरदार घणाघात केला आहे. शिवाय, भाजपचे बिहारमधील खासदार निशिकांत दुबे यांनी राज ठाकरेंबाबत केलेल्या टीका टिप्पणीवरूनही आदित्य ठाकरे यांनी पलटवार केला आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, ''भाजप दरोरोज त्यांचा महाराष्ट्राप्रतीचा द्वेष ह्या ना त्या मार्गाने ओकत आहे!  काल भाजपने मराठी माणसाची/महाराष्ट्राची तुलना पाकिस्तानातून पहलगाम येथे आलेल्या दहशतवाद्यांशी केली. ज्यांनी हिंदूंचा नरसंहार केला, तोसुद्धा भाजप सरकारच्या अपयशामुळे! आणि आजवर त्यांना पकडण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे.''

''आज भाजपचा तो खासदार, ज्याच्या ऐय्याश पार्टीसाठी पहलगाम हल्ल्याच्या काही दिवस आधी काश्मीरची सुरक्षा वापरली गेली असं आपण सर्वांनी ऐकलं, त्याने महाराष्ट्राबद्दल अश्लाघ्य आणि घृणास्पद वक्तव्य केले आहे. प्रश्न असा आहे की भाजप ह्या थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की महाराष्ट्रद्वेष हाच भाजपचा खरा डीएनए आहे?'' असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला आहे.

तसेच, ''हे ऐकून मला जितका राग आणि घृणा वाटली आहे, तितकंच आपल्याला हेही समजून घ्यावं लागेल की हे सर्व भाजपचं जुनंच “फोडा आणि राज्य करा” धोरण आहे, खास करून बिहार आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी!'' असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

याशिवाय, ''महाराष्ट्राबद्दल भाजपाच्या मनात असलेल्या द्वेषाशिवाय, भाजप कधीच निवडणुका शांततेने किंवा प्रगतीशील मार्गाने जिंकू शकत नाही. त्यांचा फॅार्म्युला ठरलेला असतो, द्वेष, फूट आणि भांडणं!  पुढच्या काही दिवसांत, भाजप त्यांच्या बाहुल्यांमार्फत मराठी, महाराष्ट्र आणि आपल्या संस्कृतीविरोधात विष पेरणार आहे, जेणेकरून आपण प्रतिक्रिया देऊन त्यांच्या 'प्लेबूक' जाळ्यात अडकू.'' असं आदित्य ठाकरे यांनी बोलून दाखवलं.

याचबरोबर ''हे भाजपचे बाहुले मराठी आणि महाराष्ट्रविरोधात द्वेष निर्माण करतील, जेणेकरून मराठी आणि अमराठी अशी समाजात फूट पडावी. पण सावध राहा — हीच भाजपची नीती आहे. आणि जर भाजपने ह्या दोघांविरोधात कारवाई केली नाही, तर हे स्पष्ट होईल की महाराष्ट्राविषयीचा द्वेष हाच भाजपचा खरा चेहरा आहे!'' अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांचा जपान अन् दक्षिण कोरियाला मोठा धक्का! ; २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा

Modi Government and Farmers : शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS! ; कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली मोठी माहिती, 'आता लवकरच...'

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

SCROLL FOR NEXT