मुंबई

सर्वात मोठी बातमी ; २० एप्रिल नंतर महाराष्ट्रात 'या' गोष्टी होणार सुरु...

सकाळवृत्तसेवा

मुंबई - २० एप्रिल नंतर देशातील कोरोना ग्रीन झोनमधील अनेक गोष्टी सशर्त सुरु होणार आहेत. याबाबत स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी  दिली होती. या पार्श्वभूमीवर केंद्राकडून एक नोटिफिकेशन देखील काढण्यात आलं होतं. अशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण असल्याने महाराष्ट्रात त्यापैकी किती गोष्टी सुरु होणार याबद्दल साशंकता होती. दरम्यान आता महाराष्ट्र सरकारने एक नोटिफिकेशन जारी केलंय. यामध्ये महाराष्ट्रात २० एप्रिल नंतर काय काय सुरु होणार याबाबत माहिती देण्यात आली आहे. 

20 एप्रिलनंतर राज्यातील काही भागांत पुरेशी काळजी घेऊन तसेच अटी व शर्तींच्या अधीन राहून औद्योगिक, व्यावसायिक उपक्रमांना  सुरू करण्यात येणार आहे.  जेणेकरून राज्यतच्या अर्थव्यवस्थेचे चक्र हळूहळू पूर्वपदावर येण्यास मदत होईल. यादृष्टीने राज्य सरकारने आता सुधारित मार्गदर्शक आदेश जारी केलेत. 

२० एप्रिलनंतरही हे बंदच राहणार 

  • सिनेमागृहं आणि मॉल्स, जिम, स्विमिंग पूल्स , थिएटर्स , स्पोर्ट्स सेंटर्स 
  • आदरातिथ्य म्हणजेच हॉस्पिटॅलिटी सेवा, बार्स 
  • सामाजिक, धार्मिक , राजकीय, क्रीडा कार्यक्रम
  • जिल्ह्यांतर्गत आणि राज्यांतर्गत प्रवासी रस्ते, रेल्वे आणि विमान वाहतूक
  • रिक्षा किंवा टॅक्सी सर्व्हिस 
  • शाळा, महाविद्यालयं आणि सर्व शिक्षण संस्था, कोचिंग क्लासेस 

२० एप्रिलपासून 'या' गोष्टी सुरु आहे सशर्त परवानगी

  • जीवनावश्यक वस्तूंची दुकानं
  • जीवनावश्यक वस्तूंची मालवाहतूक करणारे ट्रक, ट्रक्सचे गॅरेजेस
  • शेतीसंबंधीची सर्व कामं, खत आणि कीटकनाशकांची विक्री करणारी दुकानं, मत्स्य व्यवसाय, सिचन प्रकल्प, मनरेगाची कामं
  • डिजिटल व्यवहार
  • आयटी सेवा आणि कॉल सेंटर्स ( ५० टक्के कर्मचारी )  
  • कुरिअर सेवा
  • ऑनलाईन शिक्षण
  • सरकारी कार्यालयं
  • आरोग्य सेवा
  • लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या लोकांसाठी राहण्याची व्यवस्था करणारे हॉटेल्स , मोटेल्स अंडी क्वारंटाईन सेंटर्स 
  • इलेक्ट्रिशियन, प्लम्बर्स, मोटार मेकॅनिक्स, IT सुविधा देणारे कर्मचारी  

अर्थातच कोरोनाचा मुकाबला करणे हे लॉकडाऊनचे मूळ उद्दिष्ट्य अबाधित राहून कंटेंनमेंट क्षेत्र घोषित केलेली ठिकाणे वगळून इतरत्र स्थानिक प्रशासनाच्या अधिकारात हे सुधारित आदेश लागू राहतील. केंद्राने निर्देश दिल्याप्रमाणे लॉकडाऊन 3 मे पर्यंत आहे. त्याचे अतिशय काटेकोर पालन करायचे आहे . सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छतेचे नियम पाळणे, नियमित मास्क घालणे या व अशा कोणत्याही बाबी शिथिल करण्यात आलेल्या नाहीत. कुठल्याही कारणांसाठी गर्दी झालेली चालणार नाही. धार्मिक उत्सव, प्रार्थनास्थळांवरील गर्दी, मेळावे, खेळाच्या स्पर्धा, परिषदा, सभा यांच्या आयोजनाला परवानगी असणार नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Break-Free Toll Plaza : देशातील पहिला ‘ब्रेक फ्री’ टोल प्लाझा ‘या’ राज्यात झाला तयार! ; २ फेब्रुवारी पासून चाचण्या सुरू

Navjot Kaur Sidhu quits Congress : पंजाबमध्ये काँग्रेसमध्ये मोठी घडामोड! ; नवज्योत कौर सिद्धू यांनी अखेर सोडला पक्ष

IND vs NZ, 5th T20I: भारतीय संघाने मैदान मारलं, न्यूझीलंडविरुद्ध मोठा विजय मिळवला; इशान किशनच्या शतकानंतर अर्शदीपच्या ५ विकेट्स

Railway Toilet Incident Video : "गेट तोडा नाहीतर मी मरेन..." ; माजी मुख्यमंत्र्यांचे मीडिया सल्लागार अडकले रेल्वेच्या शौचालयात!

Manoj Jarange: रस्ता काट्यांना भरलेला, गिधाडांपासून सावध राहा, मनोज जरांगेंच्या सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला, काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT