मुंबई

आठ वर्षांच्या लढ्याला आलं यश, अखेर विद्यापीठातील अस्थायी कर्मचाऱ्यांसाठी आली गोड बातमी

संजीव भागवत

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या विविध आस्थापनेवर मागील अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या अस्थायी कर्मचाऱ्यांना लवकरच किमान वेतन मिळणार आहे. या वेतनासाठी मागील आठ वर्षांपासून कर्मचारी संघटना, सिनेट सदस्यांनी मागणी लावून धरली होती. मुंबई विद्यापीठातील अस्थायी कर्मचाऱ्यांच्या या निर्णयामुळे राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनाही याचा लाभ होणार आहे.

मुंबई विद्यापीठातील या अस्थायी कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने नुकतेच एक परिपत्रक जारी केल्याने यासाठी विद्यापीठात कार्यरत असलेल्या 900 हुन अधिक कर्मचाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर त्यामुळे अशाच प्रकारे मुंबई विद्यापीठाच्या सेवेत असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या वेतनातील तफावत दूर केली जावी अशी मागणी सिनेट सदस्यांनी केली आहे.

विद्यापीठातील बहुतांश कामकाज हे कंत्राटी तत्वावर नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सुरू आहे, यात अनेक कर्मचारी हे मागील 10 ते 15 वर्षांपासून कार्यरत असून त्यांना विद्यापीठाच्या कंत्रातदारांकडून मानधन म्हणून केवळ 8 ते 9 हजार रुपयांची बोलवण केली जात होती. विद्यापीठाच्या अत्यंत महत्वाच्या कामात कार्यरत असलेल्या या अस्थायी कर्मचारी वर्गाला कायमस्वरूपी करावे अशी मागणी केली जात होती. यासाठी मुंबई विद्यापीठाच्या सिनेटमध्ये अनेकदा चर्चा ही झाली होती, मात्र त्यावर निर्णय झाला नव्हता.

दरम्यान, कंत्राटी आणि विद्यापीठात कायमस्वरूपी असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या वेतानातही मोठी तफावत आहे. त्यात विद्यापीठाने मागील काही वर्षात बाह्य संस्थेकडून हे सुरक्षा रक्षक नेमल्याने यावर अद्यापही वाद सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: पुण्यात १,०२,००२ दुबार मतदार; इतर शहरांची परिस्थिती काय? राज ठाकरेंनी सांगितली आकडेवारी

Local Megablock: रेल्वेमार्गावर तब्बल ७८ दिवसांचा ब्लॉक, लोकल वाहतूक ठप्प होणार; प्रवाशांचे हाल!

म्हणून अमृता खानविलकरसोबतचे फोटो शेअर करत नाही... सई ताम्हणकरने सांगितलं कारण; म्हणाली- मैत्रीमध्ये...

Solapur Crime : सावकारांच्या छळाला कंटाळून नगरपरिषद कर्मचाऱ्याने संपवले जीवन; सात जणांविरोधात गुन्हा दाखल

हातात पुजेची टोपली अन् मदतीसाठी महिलांच्या किंचाळ्या...वेंकटेश्वर स्वामी मंदिरातील चेंगराचेंगरीचा थरारक VIDEO समोर

SCROLL FOR NEXT