school teacher
school teacher 
मुंबई

आम्हीही नाही जाणार शाळेला; विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षकांचाही नकार...

शर्मिला वाळुंज

ठाणे : यंदा 15 जूनला शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट ऐकायला मिळणार नसला, तरी शिक्षकांनी शाळेत हजर राहण्याचे आदेश शिक्षण खात्याने दिले आहेत. सध्या कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने शिक्षक मात्र शाळेत येण्यास तयार नाहीत. ऑनलाईन शिक्षण घरातूनही विद्यार्थ्यांना देऊ शकतो. त्यामुळे शाळेत येण्याची सक्ती नको, असे बहुसंख्य शिक्षकांचे म्हणणे आहे. 

2020 - 21 या शैक्षणिक वर्षाची सुरुवात येत्या 15 जूनपासून होत असल्याचे शिक्षण विभागाने स्थानिक संस्थांना कळवले आहे. त्यानुसार सर्व खासगी अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थ सहाय्य व्यवस्थापनाच्या शाळांना सूचना देण्यात आली आहे. तसेच सोमवारपासून शिक्षकांना शाळेत हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. यावर शिक्षकांनी हरकत घेतली आहे. ठाणे जिल्ह्यात शहरी भागात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरत आहे, ग्रामीण भागातही याचा धोका आहेच. 

सोमवारपासून शैक्षणिक वर्षाची सुरुवात ही ऑनलाईन पद्धतीने होत असून शिक्षकांनी शाळेत येऊन ऑनलाईन वर्ग घ्यावेत, अशी सूचना करण्यात आली आहे, परंतू विद्यार्थी शाळेत हजर राहणार नसल्याने शाळा व्यवस्थापनांनाही शाळा सुरु करणे, शिक्षकांना शाळेत बोलावण्याची सक्ती केली जाऊ नये, असे शाळा व्यवस्थापनांचे म्हणणे आहे. शाळा सुरु होण्याविषयी अद्याप कोणताही ठोस निर्णय झाला नसताना मुख्याध्यापकांना शाळा सॅनिटाईझ करणे, शाळेची साफ सफाई करण्यास सांगितले आहे, त्याऐवजी शाळा पूर्णतः सुरु होईल त्याच्या 15 दिवस आधी हे सगळे करणे उचित आहे. कोणताही एक ठोस निर्णय दिला जात नसल्याने गोंधळ उडाला असल्याचे शाळा व्यवस्थापकांनी सांगितले. काही शिक्षण संस्थांनी शिक्षकांना घरुनच ऑनलाईन वर्ग घेण्याची परवानगी दिली आहे. तसेच शिक्षण विभागालाही याविषयी कळवले असून आता शिक्षण विभाग, यावर काय निर्णय घेते, याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे.  

सोमवारपासून शाळेत येण्याविषयी सूचना आली आहे, परंतू शिक्षक शाळेत जाण्याच्या मानसिकतेत नाहीत. कोरोनाचा प्रसार वाढत असून विद्यार्थी शाळेत हजर राहणार नाहीत. मग शिक्षकांना का बोलाविले जात आहे ते कळत नाही. याविषयी शिक्षण विभागाकडे शाळा व्यवस्थापनांचा पाठपुरावा सुरु असून निर्णय सोमवारपर्यंत कळेल. 
- प्राची शिसोदे, शिक्षक, ठाणे 

शिक्षकांना शाळेत येण्याच्या सूचना मिळाल्या आहेत, परंतू शहरातील कोरोनाबाधितांचा वाढता आकडा पाहता शालेय व्यवस्थापनाने शिक्षकांना जूनपर्यंत घरुनच विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याविषयी सूचना केली आहे. विद्यार्थ्यांना टाईमटेबल दिले असून त्यांचे शिक्षण सुरु केले आहे. विविध शाळांशी आम्ही संपर्क साधला आहे, अनेक शिक्षकांना वाहतुकीचे साधन नसल्यानेही शाळेत येणे शक्य नाही आहे. सर्व गोष्टी शिक्षण विभागास कळवल्या असून याविषयी चर्चा सुरु आहे. 
- मिताली इनामदार, मुख्याध्यापिका, डोंबिवली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT