मुंबई

लग्नाचा ट्रेंड बदलतोय ! लग्नासाठी सक्रीय पुढाकार घेणाऱ्या महिलांची संख्या वाढली

भाग्यश्री भुवड

मुंबई, ता.17 : लॉकडाऊनकाळात जग जागच्या जागी थांबले. मात्र या काळातही युवा पीढीने आपल्या भविष्यातील जोडीदाराचा शोध घेणे काही थांबवले नाही. देशातील आघाडीची ऑनलाईन विवाह वेबसाईट असणाऱ्या मॅट्रीमोनी साईटच्या ताज्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. या काळात जवळपास 40 लाख  तरुण, तरुणींनी आपल्या भविष्यातील साथीदारांचा ऑनलाईन शोध घेतला. 1.5 अब्ज वेळा त्यांना आवडत असलेल्या जोडीदाराचे प्रोफाईल चेक केले, लाईक केले. 

देशात लग्नाचा ट्रेंड बदलत असल्याचेही चित्र या अहवालाच्या माध्यमातून समोर आले आहे. आताची तरुण पिढी स्वतःचा पार्टनर स्वतःच शोधतात. परंपरागत पध्दतीने ते या कामी आता कुटुंबातील सदस्यांची मदत घेत नाहीत. या काळात  40 लाखापैकी 70 टक्के युवक, युवतींनी स्वताच वेबसाईटसाठी नोंदणी करुन घेतली. यापुर्वी ही नोदणी कुटुंबातील व्यक्ती करायचे. मात्र मुंबई, दिल्ली, हैदराबाद, चेन्नई ही शहरे नोंदणी करण्यात आघाडीवर आहे. 

आपला साथीदार कुठल्या शहरात राहतो, याला नवी पिढी फार महत्व देतांना दिसत नाही.  77 टक्के पुरुष, 80 टक्के महिला आता देशात किंवा परदेशातील जोडीदारासोबत सेटल होण्यात तयार आहेत.

यापुर्वी साथीदार निवडण्यात पहिले पाऊल उचलण्यात महिला अडखळत होत्या. मात्र हे  चित्र आता बदलले आहे. लग्नासाठी 30 टक्केपेक्षा अधिक महिला आता सक्रीय पुढाकार घेत आहे. लग्नाचा प्रस्ताव पुरुषांकडे मांडण्यात स्त्रिया पुढे आहेत. पुरुषांकडून आलेला प्रस्ताव स्विकारण्याचे प्रमाणही 25 टक्क्याने वाढले आहे. कोरोना काळात आपला साधीदार शोधण्यासाठी अँप्सचा वापर करणाऱ्या महिलांचे प्रमाण 59 टक्के वाढलं. 

या काळात देशभरात मॅट्रीमोनी साईटवर नोंदणी वाढली. गेल्या वर्षाची तुलना करता, उत्तर भारतात महिलांची नोंदणी 75 टक्क्याने तर पुरुषांची नोंदणी 100 टक्क्याने वाढली.  

  • लॉकडाऊन काळात पार्टनरचा शोध थांबला नाही
  • लॉकडानमध्ये 40 लाख  तरुण, तरुणींनी घेतला साथीदारांचा शोध
  • 1.5 अब्ज वेळा तपासले आवडत्या व्यक्तीचे प्रोफाईल 
  • लग्नाचा निर्णय घेण्यात तरुण पिढी आघाडीवर
  • 40 लाखापैकी 70 टक्के युवक, युवतींनी वेबसाईसाठी नोंदणी
  • मॅट्रीमोनी साईटचा वापर करण्यात मुंबई, दिल्ली, हैदराबाद, चेन्नई ही शहरे आघाडीवर
  • लग्नासाठी 30 टक्के महिलांचा सक्रीय पुढाकार
  • पुरुषांकडून आलेला प्रस्ताव स्विकारण्याचे प्रमाणही 25 टक्क्याने वाढले
  • मॅट्रीमॉनी अप्लिकेशन वापरणाऱ्या महिलांचे प्रमाण 59 टक्कांने वाढलं 
  • 77 टक्के पुरुष, 80 टक्के महिलांची सेटल होण्यासाठी शहराची अट नाही

( संपादन - सुमित बागुल )

amid corona lockdown trends of getting married changed major response to matrimony sites

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Election: महापालिका निवडणुकीत खेळीमेळी की खेळी? बिनविरोध विजयांमागचं सत्य आयोग शोधणार; अहवाल मागवला, आता चौकशी होणार!

Arjun Tendulkar: अर्जुनचा पुन्हा फ्लॉप शो! गोवा संघाची हार, सूर्यवंशीच्या ८७ चेंडूंत नाबाद ११५ धावांनी गाजवला सामना

Pune News: कुंजीरवाडीच्या माजी सदस्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; कुटुंब थोडक्यात बचावले, प्रसंगावधान राखल अन् काय घडलं!

Latest Marathi News Live Update : संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात बिबट्या जेरबंद

Pune News:...अखेर तीन बछडे आईच्या कुशीत सुखरूप; आंबेगाव तालुक्यातील शेतात आढळली बछडे, बिबट्या मादीचा जीव भेटीसाठी कासावीस!

SCROLL FOR NEXT