Animal struggle for water sakal media
मुंबई

मोखाड्यात भीषण पाणी टंचाईच्या झळा; चारा, पाण्याच्या शोधात जणावरांचे स्थलांतर

भगवान खैरनार

मोखाडा : रोजगाराच्या शोधात मोखाडा (Mokhada) या आदिवासी तालुक्यातील मजूर शहराकडे दरवर्षी स्थलांतर करतात. आता मुक्या जनावरांनाही (Animals) जगवण्यासाठी चारा, पाण्याच्या शोधात हे स्थलांतर सुरू झाले आहे. मोखाड्यातील सायदे-जोगलवाडी ग्रामपंचायत हद्दीतील शेकडो जनावरांचे जत्थे गुराख्यांसह नदीकाठी स्थलांतरित होत आहेत. या भागात सरकारने (Indian government) मागणीप्रमाणे जनावरांना पाणीपुरवठा (water supply) सुरू केला आहे; मात्र हिरवा चाराच मिळत नसल्याने अखेर जनावरे आणि गुराखी नियमित पावसाळा सुरू होईपर्यंत, म्हणजे तब्बल तीन महिन्यांसाठी स्थलांतरित होऊ लागले आहेत.

पालघर जिल्ह्यातील सर्वात भीषण पाणीटंचाई मोखाडा तालुक्यात असते. तालुक्यातील टंचाईग्रस्त गाव-पाड्यांची संख्या ८० ते १०० च्या दरम्यान जाते. त्यांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. सरकारकडून केवळ नागरिकांनाच पाणी दिले जात होते. जनावरांनाही पाणी मिळावे म्हणून `सकाळ`ने अनेक वर्षे पाठपुरावा केला होता. अखेर गेल्या वर्षापासून मोठ्या जनावरांना ३५ ते ४० लिटर आणि लहान जनावरांना १५ ते २० लिटर या प्रमाणात मोखाड्यात मागणीप्रमाणे सरकारने टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला आहे; मात्र हिरवा चारा जनावरांना मिळत नाही. पाण्याचा प्रश्‍न सुटला असला तरी चाऱ्याचा प्रश्‍न मात्र ऐरणीवर आला आहे.

तालुक्यातील सायदे-जोगलवाडी ग्रामपंचायत हद्दीतील शेकडो जनावरांना मिळणारा हिरवा चारा आणि पाणी यांचा स्रोत उन्हाची तीव्रता वाढल्याने आटला आहे. नदी, नाले आणि पाणवठे कोरडे पडू लागले आहेत. त्यामुळे मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात गारगई नदीकाठी या जनावरांचे स्थलांतर होत आहे. या ठिकाणचा हिरवा चारा आणि पाणी संपल्यानंतर वाडा, वज्रेश्वरी भागात ही जनावरे स्थलांतरित होतात. नियमित पावसाळा सुरू होईपर्यंत त्यांचे स्थलांतर सुरूच असते. मोखाड्यात ४० हजारांहून अधिक जनावरे आहेत. त्यामुळे जनावरे नदीकाठी नेऊन तेथेच वास्तव्य करावे लागते. याठिकाणी त्यांना हिरवा चारा आणि पाणी पुरेशा प्रमाणात मिळत असल्याचे गुराख्यांनी सांगितले.

उष्णता वाढल्याने जनावरांना हिरवा चारा मिळत नाही. त्यामुळे गावापासून दूर नदीकाठी स्थलांतर व्हावे लागते. पावसाळा सुरू होण्यापूर्वी आम्ही गावाकडे म्हणजे तीन महिन्यांनंतर घरी परत येतो.
- चांगुणा हाडोंगा, गुराखी महिला, मोखाडा.

पाणी साठवण व्यवस्था अपुरी

१) सद्यस्थितीत सरकारने दापटी १, दापटी २, स्वामीनगर, हेदवाडी, गवरचरीपाडा आणि ठाकूरवाडी या ठिकाणी नागरिकांसह जनावरांनाही टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केल्याची माहिती मोखाडा पंचायत समिती प्रशासनाने दिली आहे. टॅंकरचे पाणी विहिरीत टाकले जाते. हे पाणी काढून जनावरांना पिण्यासाठी द्यावे लागते.
२) जनावरे चाऱ्याच्या शोधात सैरावैरा फिरत असल्याने त्यांना विहिरीतून पाणी काढून पाजणे शक्य होत नाही. जनावरांसाठी विहिरींव्यतिरिक्त हौद अथवा अन्य ठिकाणी पाणी साठवण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे पाण्यावाचूनही जनावरांचे हाल होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबई सुरक्षेत चौथ्‍या स्‍थानावर! ‘राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण’चा अहवाल; सर्वाधिक गुन्हेगारी कोणत्या शहरात?

मुसळधार पावसाचा हाहाकार! पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू, भूस्खलनामुळे रस्ते बंद

Kolhapur News : देवीची मूर्ती मंडपात; साउंडची ईर्ष्या चौकात, पोलिसांनी काठ्यांनी मारलं तरीही बारा तासांहून अधिक काळ मंडळांनी अडवले रस्ते

Latest Marathi News Live Update: शेतकर्‍यांना आज मदतीची गरज- शरद पवार

Kolhapur Tragedy : क्लासमध्ये ओळख, मैत्रिणीला कोल्हापुरातून उचललं; पंढरपुरात ४ दिवस कोंडलं, कोकणात नेलं पण तिथून पळून गेली अन्...

SCROLL FOR NEXT