lockdown
lockdown 
मुंबई

मुंबईतील 'या' चार विभागांमध्ये  पुन्हा लॉकडाऊन करा; पोलिसांचा महापालिकेपुढे प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - महापालिका अधिकारी आणि मुंबई पोलीस यांच्यात झालेल्या बैठकीमध्ये मुंबई पोलिसांनी गोरेगाव ते दहिसरदरम्यान चार भागांमध्ये लॉकडाउन पुन्हा लागू करण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिकेसमोर  ठेवला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनचे होणारे उल्लंघन बघता पोलिसांनी हा प्रस्ताव ठेवला होता.  मात्र मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मात्र हे शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. 
 
गेल्या आठवड्यात मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये पोलिसांत दाखल झालेल्या प्रत्येक चार गुन्ह्यांमागे तीन गुन्हे हे लॉकडाउनच्या नियमांचा भंग केल्याच्या प्रकरणातील होते. महापालिका अधिकारी आणि मुंबई पोलीस यांच्यात शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीत मुंबई पोलिसांनी गोरेगाव ते दहिसरदरम्यान चार भागांमध्ये लॉकडाउन पुन्हा लागू करण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र महापालिका अधिकाऱ्यांनी सध्या लॉकडाऊन लागू न करण्याचे म्हटले आहे.

दहिसरमध्ये कोरोनाचा दुपटीचा दर मोठा असल्याचे निदर्शनास आले आहे.  शनिवारपर्यंतच्या आकडेवारीनुसार मुंबईचा दुपटीचा दर ३४ दिवस आहे.  मालाड पूर्व येथे गेल्या आठवड्यात पुन्हा एकदा पूर्ण लॉकडाउन लागू करण्यात आला होता. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला. 

मुंबई पोलिसांनी पश्चिम उपनगरातील चार भागात लॉकडाउन लागू कऱण्याचा प्रस्ताव ठेवला असला तरी तो व्यवहार्य नाही. ७० टक्के केसेस या मोठ्या इमारतींमधील असून ३० टक्के रुग्ण झोपडपट्ट्यांमधील आहेत. या आधीच कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर आहेत. मोठ्या इमारतींमधील रुग्णसंख्या जास्त असल्याने आम्ही त्यांच्या हालचालींवर निर्बंध आणत आहोत असे येथील सहाय्यक आयुक्तांनी म्हटले आहे. 

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ जून ते १८ जून दरम्यान शहरात ५९१ गुन्हे दाखल करण्यात आले असून एकट्या उत्तर मुंबईत ४३१ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. दहिसर, समता नगर, कांदिवली पोलीस स्टेशन येथे सर्वात जास्त गुन्हे दाखल झाले आहेत. मास्क न घालणे, मर्यादेपेक्षा जास्त वेळ दुकान सुरु ठेवणे, दुचाकीवरुन दोघांनी प्रवास करणे याप्रकरणी हे गुन्हे दाखल आहेत.

यामुळे  या दोन ठिकाणी तसंच कांदिवली पूर्व येथील काजूपाडा आणि दहिसर पश्चिमेकडील गणपत पाटील नगर येथे लॉकडाउन वाढवण्याचे महापालकेला सुचवले, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली. 

apply lockdown in these 4 wards police seeks to bmc

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

Water On Moon : चंद्रावर अपेक्षेपेक्षा जास्त पाण्याचे साठे.... इस्त्रोने केला मोठा खुलासा

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आसामच्या काही भागांमध्ये पूर

SCROLL FOR NEXT