पंजाबचा किन्नू मुंबईकरांना भावतोय!  
मुंबई

पंजाबचा किन्नू मुंबईकरांना भावतोय!

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : अवकाळी पावसामुळे यंदा संत्री हंगामावर मोठा परिणाम झाला आहे. नागपुरी संत्रीचे उत्पादन घटल्याने, राजस्थान, पंजाबमधील किन्नू संत्र्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. संत्र्यांमध्ये जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात असतात. जीवनसत्त्व- क चे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने लोक आवडीने खातात. किन्नूच्या 45 नगाच्या पेटीला 250 ते 300 रुपये दर मिळत आहे; तर किरकोळ बाजारात एका किलोला दर्जानुसार 60 ते 80 रुपये भाव मिळत आहे. 

यंदा अवकाळी पाऊस व प्रतिकूल हवामानामुळे नागपुरी संत्र्यांच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला. त्यामुळे सध्या बाजारात राजस्थान, पंजाब या राज्यातून येणाऱ्या किन्नू संत्र्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आकारावरून संत्र्याची किंमत ठरत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. रंगाने पिवळे तांबडे, दिसायला आकर्षक, चवीला आंबट-गोड असणाऱ्या किन्नू संत्र्यांची तुर्भे एपीएमसी मार्केटमध्ये आवक सुरू झाली आहे. बाजारात या फळाला किन्नू संत्री असे म्हटले जाते. राजस्थानमधून या किन्नू संत्र्यांची आवक सध्या फळबाजारात सुरू झाली आहे. मोकळी संत्री 30 ते 40 रुपये किलो दराने विकली जातात; तर पेटीमधील संत्री ही नगाने विकली जातात. त्यामध्येही आकारमानानुसार दर ठरवले जातात. 

पुढील काही दिवसात किन्नू संत्र्यांची आवक वाढेल, असे व्यापारी आरिफ शेख यांनी सांगितले. यंदा पोषक हवामानामुळे किन्नू संत्र्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. हे फळ दिसायलाही आकर्षक असल्याने त्यास शहर व परिसरातून संत्र्याला पर्याय म्हणून चांगली मागणी आहे. डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात किन्नू संत्र्यांची आवक सुरू होते. किन्नू संत्र्यांचा हंगाम साधारणपणे मार्चपर्यंत सुरू असतो. किरकोळ ग्राहक, फळविक्रेते; तसेच ज्यूस विक्रेत्यांकडूनही किन्नू संत्र्याला चांगली मागणी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. 
 
संत्री पेटी किंमत 
45 नग 250/300 

54 नग 280/300 

60 नग 310/260 

72 नग 300/250 


किन्नू संत्र्यांची सर्वाधिक लागवड राजस्थानमधील गंगानगर जिल्ह्यात होते. त्याखालोखाल पंजाबमध्ये किन्नू संत्र्यांची लागवड केली जाते. ही संत्री आणि मोसंबीचा संकर आहे. बाजारात सध्या तिची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. अवकाळी पावसाचा फटका बसल्याने नागपुरी संत्रीचे उत्पादन घट झाली आहे. त्यामुळे किन्नू संत्र्याचा हंगाम आणखी दीड-दोन महिने चालणार आहे. 
- भरत देवकर, फळव्यापारी, एपीएमसी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! २९ महापालिकांचं बिगुल आज वाजणार, राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

IPL 2026 Auction live : ७७ खेळाडूंचं नशीब बदलणार, २३७.५५ कोटींचा पाऊस पडणार... ऑक्शन केव्हा, कुठे व किती वाजता होणार; जाणून घ्या सर्व माहिती

New Year 2026 Trip Idea: नवीन वर्षाची सुरूवात करा हटके पद्धतीने! गर्दीपासून दूर असलेली भारतातील ‘ही’ ठिकाणे एकदा पाहाच

EPFO Provident Fund : घरबसल्या 1 मिनिटात तपासा आपला PF बॅलन्स! जाणून घ्या EPFO पासबुक पाहण्याचे सोपे, जलद मार्ग आणि नवीन सुविधा

जनावरांच्या बाजारात रिपोर्टिंग करत होती पत्रकार, बैलानं अचानक केला हल्ला; VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT