सख्खा भाऊ पक्का वैरी, नोकरांसमोर अपमान करतो म्हणून काढला काटा...
सख्खा भाऊ पक्का वैरी, नोकरांसमोर अपमान करतो म्हणून काढला काटा... 
मुंबई

सख्खा भाऊ पक्का वैरी! नोकरांसमोर अपमान करतो म्हणून काढला काटा...

सकाळ वृत्तसेवा

ठाणे (बातमीदार) : नोकरांसमोर अपमानित करतो तसेच, इच्छेविरुद्ध दुकानाचे कामकाज करतो, या रागातून लहान भावाने मोठ्या भावाची हत्या केल्याची घटना गुरुवारी (ता. 2)  सायंकाळी ठाण्यातील कोपरी मार्केटमध्ये घडली. महेश चावला (48, रा. किशोरनगर, कोपरी) असे मृताचे नाव आहे. 

याप्रकरणी, कोपरी पोलिसांनी मृताचा लहान भाऊ अनिल चावला (45), नोकर शोबीत ऊर्फ पिचकु सिंग (19) आणि अभय ऊर्फ गोरे अग्नीहोत्री (19) या तिघांना अटक केली. हत्येनंतर अनिल याने शिडीवरून पडल्याने भावाचा मृत्यू ओढवल्याचा बनाव रचला होता. मात्र, वैद्यकीय तपासणीत बिंग फुटल्याने काही तासातच हत्येचा उलगडा करण्यात यश आले, अशी माहिती पोलिस निरीक्षक दत्ता गावडे यांनी दिली. 

ठाणे पूर्वेकडील कोपरी, गावदेवी मंदिरसमोर चावला बंधुंचे मे. रतन सुपरमार्केट हे तळ अधिक एकमजली दुकान आहे. दुकानाच्या दुसऱ्या मजल्यावर आरोपी अनिल चावला राहतो. तर, दुकानासमोरील किशोरनगरमध्ये मृत भाऊ महेश हा पत्नी व दोन मुलांसह राहतो. दुकानात दोन कॅश काऊंटर केल्याने महेशचे अनिलशी वारंवार खटके उडत होते. दुकानातील नोकरांसमोर दोन्ही भावांमध्ये तणातणी होत असे. वारंवार नोकरांसमोर अपमानित व्हावे लागत असल्याचा राग मनात धरून अनिल याने 2 जुलैला लॉकडाऊन असतानाही सायंकाळच्या सुमारास सिंग, गोरे व अन्य एका नोकराला दुकानात बोलवले. तसेच, संधी साधून दुकानाच्या वरच्या भागात भाऊ महेश याच्यावर लोखंडी स्टुलाचे प्रहार करून त्याची हत्या केली. यावेळी सिंग व गोरे हे दोघे नोकर अनिलसोबत होते. तर, एक नोकर दुकानाबाहेर थांबला होता. अती रक्तस्त्राव झाल्याने महेश जागीच ठार झाल्यानंतर अनिल याने, दुकानाच्या शिडीवरून पडून महेशचा मृत्यू झाल्याचा बनाव रचला. मात्र, वैद्यकिय तपासणीत बिंग फुटल्यानंतर चौकशीमध्ये तिघांनीही हत्येची कबुली दिली. तिन्ही आरोपींना 8 जुलैपर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हत्या पूर्वनियोजित
आरोपी अनिल याचे भाऊ महेश याच्याशी दुकानातील व्यवहारावरून बिनसले होते. दुकानात स्वतंत्र काऊंटर करून बिलांमध्ये अपहार करीत असल्याबाबत महेशने अनिलला अनेकदा झापले होते. याचा वचपा काढण्यासाठी अनिलने हत्येचा कट रचला. लॉकडाऊन असतानाही दुकानात नोकरांना बोलावून हत्येपूर्वी तीन तास अगोदर सीसी टिव्ही कॅमेरे बंद ठेवले. त्यानंतर हत्या करून दुर्घटना घडल्याचा बनाव रचत पोलिसांवर राजकीय दबावदेखील आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर खुनाला वाचा फुटली अन अनिलचा कट उघड झाला. यातील धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी अनिलविरोधात मृताच्या कुटुंबीयांनी अद्याप तक्रारदेखील केली नसल्याने पोलिसांनाच सध्या फिर्यादी बनावे लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT