File Photo
File Photo 
मुंबई

कोरोनाला निष्प्रभ करण्यासाठी ही कंपनी करतेय औषधाची निर्मिती

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईतील लासा सुपरजेनेरिक्‍स व इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्‍नॉलॉजी (आयसीटी) यांनी कोविड- 19 विषाणूला निष्प्रभ करण्याच्या औषधातील "फेव्हीपिरवीर' हा घटक विकसित करण्यास सुरुवात केली आहे. 
लासा सुपरजेनेरिक्‍सचे अध्यक्ष डॉ. ओंकार हेर्लेकर यांनी नुकतीच ही माहिती दिली.

कोविड- 19 विषाणू निष्प्रभ करण्यात "फेव्हीपिरवीर' हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. हा घटक विकसित करून त्याचे उत्पादन वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत. हे उत्पादन लवकरात लवकर बाजारात आणण्यासाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया यांची परवानगी मिळवण्यात येईल.

त्याआधी जागतिक औषध नियंत्रकाकडून मान्यता मिळवली जाईल. त्यानंतर त्याच्या चाचण्या करण्यात येतील. सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यावर या घटकाचे व्यापारी उत्पादन करण्यासाठी सरकारी मदत किंवा खासगी गुंतवणुकीचे मार्ग अवलंबले जातील, असे त्यांनी सांगितले. 

आयसीटीचे प्रा. विकास तेरलवेकर यांनी या प्रयत्नांचे स्वागत केले असून, या घातक विषाणूचा नायनाट करण्यासाठी नवे औषध उपयुक्त ठरेल, असा विश्‍वास व्यक्त केला आहे. एबोला, चिकुनगुन्या आदी अन्य घातक आजारांवरील औषधांतही हा घटक असतो.

Attempts to develop a drug on the corona

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raghuram Rajan: संपत्ती वितरणावर रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

AIMIM Chief Asaduddin Owaisi: 'मुस्लिम सर्वात जास्त वापरतात कंडोम....', AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी असे का म्हणाले?

Ban vs Ind 1st T20 : भारताची विजयाने सुरुवात! मायदेशात बांगलादेशने पत्करली शरणागती; टी-20 मालिकेत 1-0 आघाडी

Alien Life : पृथ्वीपेक्षा अडीच पट मोठ्या ग्रहावर एलियन्स असण्याचे संकेत; जेम्स वेब टेलिस्कोपच्या मदतीने घेणार शोध

Share Market Opening: शेअर बाजारात आठवड्याची जोरदार सुरुवात; सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीत

SCROLL FOR NEXT